शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णांत ७७ टक्क्यांनी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 21:49 IST

Nagpur News पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात मागील चार वर्षांच्या तुलनेत यावर्षी विक्रमी नोंद झाली. धक्कादायक म्हणजे, मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी ७७ टक्के रुग्णांची भर पडली. रुग्णांची एकूण संख्या २,२०७ तर मृतांची संख्या ९वर पोहोचली आहे.

ठळक मुद्दे चार वर्षांतील सर्वाधिक वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : डेंग्यूचा धोका वाढतच चालल्याने चिंता वाढली आहे. पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात मागील चार वर्षांच्या तुलनेत यावर्षी विक्रमी नोंद झाली. धक्कादायक म्हणजे, मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी ७७ टक्के रुग्णांची भर पडली. रुग्णांची एकूण संख्या २,२०७ तर मृतांची संख्या ९वर पोहोचली आहे. (Dengue cases increase by 77% in six districts of East Vidarbha)

पूर्व विदर्भाला डेंग्यूने घातलेला विळखा दिवसेंदिवस घट्ट होत चालला आहे. ताप कमी झाल्यानंतर दिसून येणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष होत असल्याने गंभीर रुग्णांची संख्याही वाढली आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली व वर्धा हे सहा जिल्हे मिळून २०१८ मध्ये ११९० रुग्ण - ११ मृत्यू, २०१९ मध्ये १३१६ रुग्ण - ११ मृत्यू, २०२० मध्ये ५०३ रुग्ण - २ मृत्यू तर ऑगस्ट २०२१पर्यंत २२०७ रुग्ण व ९ मृत्यूची नोंद झाली. पाऊस लांबल्यास सप्टेंबर व ऑक्टोबर या महिन्यांतही मोठ्या संख्येत डेंग्यूचे रुग्ण आढळून येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

नागपूर जिल्ह्यात डेंग्यूचा सर्वाधिक प्रकोप

पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांच्या तुलनेत या वर्षी नागपूर जिल्ह्यात डेंग्यूचा सर्वाधिक प्रकोप दिसून येत आहे. २०१९मध्ये ७४१, २०२०मध्ये १६१ तर ऑगस्ट २०२१पर्यंत १४०७ रुग्णांची नोंद झाली. त्याखालोखाल चंद्रपूर जिल्हा आहे. या जिल्ह्यात २०१९मध्ये ४६५, २०२०मध्ये २०४ तर २०२१मध्ये ३६० रुग्ण आढळून आले. गोंदिया जिल्ह्यात २०१९मध्ये ३७, २०२०मध्ये ४ तर या वर्षी १२१, भंडारा जिल्ह्यात २०१९ मध्ये १०, २०२०मध्ये ८ तर २०२१मध्ये ३६ तर गडचिरोली जिल्ह्यात २०१९मध्ये ११, २०२०मध्ये १६ तर २०२१मध्ये २५ रुग्णांची नोंद झाली.

-ऑगस्ट महिना ठरला धोकादायक

ऑगस्ट महिन्यात सहाही जिल्ह्यांमध्ये डेंग्यूचा धोका वाढताना दिसून आला. नागपूर ग्रामीणमध्ये ७९० तर शहरात ६१७, भंडारा जिल्ह्यात ३६, गोंदिया जिल्ह्यात १२१, चंद्रपूर ग्रामीणमध्ये १९३ तर शहरात १६७, गडचिरोली जिल्ह्यात २५ तर वर्धा जिल्ह्यात २५८ रुग्ण आढळून आले.

-डेंग्यूची जबाबदारी प्रत्येकाची

डेंग्यूला नियंत्रणात आणण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारी घ्यायला हवी. घरात व परिसरात पाणी साचून राहणार नाही याकडे लक्ष द्यायला हवे. दिवसाही झोपताना मच्छरदाणीचा वापर करायला हवा. संपूर्ण अंग झाकेल असे कपडे घालावेत. डेंग्यूचा डास हा साधारण सकाळी व सायंकाळी चावतो. यामुळे या वेळेत विशेष काळजी घ्यावी. कुठलीही लक्षणे अंगावर न काढता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

- डॉ. श्याम निमगडे, सहायक संचालक (हिवताप) आरोग्य सेवा, नागपूर

 

टॅग्स :dengueडेंग्यू