शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

भुते यांची न्यायालयातून माघार

By admin | Updated: September 29, 2015 04:16 IST

वासनकर वेल्थ मॅनेजमेंटकडून आरटीजीएसमार्फत अविनाश रमेश भुते यांच्या ताजश्री समूहाच्या बँक खात्यात आलेली

नागपूर : वासनकर वेल्थ मॅनेजमेंटकडून आरटीजीएसमार्फत अविनाश रमेश भुते यांच्या ताजश्री समूहाच्या बँक खात्यात आलेली ९ कोटी १९ लाखांची रक्कम परत करण्यासाठी वेळ मागणारा अर्ज खुद्द भुते यांनी एमपीआयडी कायद्याचे विशेष न्यायाधीश व्ही.टी. सूर्यवंशी यांच्या न्यायालयातून सोमवारी मागे घेतला. त्यामुळे गुंतवणूकदारांची निराशा होऊन भुतेविरुद्धचा पोलिसांच्या कारवाईचा मार्गही मोकळा झाला आहे. वासनकर वेल्थ मॅनेजमेंटने आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून ५१५ गुंतवणूकदारांची १४३ कोटी ४ लाख ६८ हजार २५४ रुपयांनी लुबाडणूक केलेली आहे. विवेक पाठक यांच्या तक्रारीवरून ९ मे २०१४ रोजी अंबाझरी पोलिसांनी प्रशांत वासनकर आणि अन्य लोकांविरुद्ध भादंविच्या ४२०, ४०६, ५०६, १२० (ब), ४०९ आणि एमपीआयडी कायद्याच्या कलम ३ अन्वये गुन्हा दाखल केले होते. या घोटाळ्याचा तपास करताना पोलीस पथकाने प्रशांत वासनकर, विनय वासनकर, भाग्यश्री वासनकर, मिथिला वासनकर, अभिजित चौधरी आणि सरला वासनकर यांच्या बँक खात्यांचे अवलोकन केले असता, या सर्व आरोपींनी लबाडीने १६ मार्च २०१३ ते २२ नोव्हेंबर २०१३ या कालावधीत भुते यांच्या व्यवसाय समूहाच्या बँक खात्यात ९ कोटी १९ लाख ८५ हजार रुपयांची रक्कम जमा केली होती. वस्तुत: ही रक्कम या सर्व आरोपींची भविष्यात कामी येणारी सुरक्षित रक्कम होती. ‘त्या’ गुंतवणूकदारांना पुढे येण्याचे आवाहनदरम्यान, अ‍ॅड. मोहन अरमरकर आणि सुधीर दुरुगकर यांनी सर्वच गुंतवणूकदारांनी वासनकर आणि सहकाऱ्यांविरुद्ध आर्थिक गुन्हे पथकाकडे तक्रारी नोंदवण्याचे आवाहन केले. मोठमोठ्या ठेवी गुंतवणाऱ्यांनी अद्याप तक्रारीच नोंदवल्या नाहीत, असे लक्षात आल्याचे ते म्हणाले. सर्व गुंतवणुकीदारांनी तक्रारी नोंदविल्यास न्याय मिळणे सोयीचे होईल, असेही ते म्हणाले.