शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

ईपीएस ९५ अंतर्गत पेन्शन ही हक्काची मागणी - अ‍ॅड. अनिल किलोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 15:52 IST

ईपीएस ९५ अंतर्गत पेन्शनची मागणी करणारे देशात तब्बल १४ कोटी लोकं आहेत. त्यांची ही मागणी हक्काची आहे.

नागपूर, दि. 5 -  ईपीएस ९५ अंतर्गत पेन्शनची मागणी करणारे देशात तब्बल १४ कोटी लोकं आहेत. त्यांची ही मागणी हक्काची आहे. १४ कोटी लोकांची संख्या ही कमी नाही. ही संख्या एखाद्या पक्षाला सत्तेत आणू शकते. तर सत्तेत असणा-यांची सत्ता उलथवू सुद्धा शकते. त्यामुळे सत्ताधा-यांनी आमची मागणी मान्य न केल्यास येत्या २०१९ च्या निवडणुकीत आम्हालाही वेगळा विचार करावा लागले अशा शब्दात सत्ताधा-यांना आमच्या एकजुटीची ताकद दाखवून देऊ, असा इशारा जनमंचचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर यांनी येथे दिला. जनमंच आणि निवृत्त कर्मचारी (१९९५) समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी रेशिमबाग मैदानवार महासंमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाला देशभरातील हजारो पेन्शनधारक सहभागी झाले होते. त्यावेळी विशेष अतिथी म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी  प्रा. शरद पाटील व निवृत्त कर्मचारी (१९९५) समन्वय समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश येंडे , राष्ट्रीय महासचिव प्रकाश पाठक, प्रभाकर खोंडे, आर.यू. केराम, रमेश पाटील, आयटकचे मोहन शर्मा, भारतीय मजदूर संघाच्या नीता चोबे व्यासपीठावर होते.अ‍ॅड. अनिल किलोर म्हणाले, दिल्लीत आपला आवाज पाहोचवण्यासाठीच या मैदानावर हे महासंमेलन आयोजित करण्यात आले आहे. कारण  या मैदानाला लागून राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे स्मृती मंदिर आहे. जवळच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे निवासस्थान आहे. आणि आज या दोघांचीही केंद्रात किती ताकद आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे या पेन्शनधारकांची एकजुट त्यांना दिसावी म्हणून हे संमेलन येथे भरवण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पेन्शन धारकांचे २ लाखा कोटी पैसे सरकारजवळ जमा आहेत. तेच पैसे आपण मागत आहोत. निवडणुकीच्या पूर्वी हजार रुपयात कसे भागणार हा अन्याय आहे, असे म्हणून आपल्या आंदोलनात सहभागी झालेली मंडळी आज सत्तेत आहेत. परंतु अजुनही आमच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत. आम्हाला ९ हजाररुपये पेन्शन हवी अशी मागणी करीत ही मागणी मान्य न झाल्यास निवडणुकीत वेगळा विचार करू असा इशाराही त्यांनी दिला.केरळचे खासदार एन.के. प्रेमचंद्रन यांनी दिल्लीवरून फोनवर मार्गदर्शन करीत मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलन करण्याचे आश्वासन दिले.  प्रा. शरद पाटील, रमेश पाटील, प्रकाश पाठक, प्रभाकर खोंडे, प्रकाश येडे यांनी हे आंदोलन आखी तीव्र करण्याचे आवाहन केले. देशभरात ही संघटना मजबुत करावी, असेही सांगितले.