शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

माकडेंची १२.४३ लाखांच्या सुपूर्दनाम्याची मागणी फेटाळली

By admin | Updated: June 14, 2017 01:20 IST

लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. पी. गायकवाड यांच्या न्यायालयाने लाच प्रकरणातील आरोपी

लाचप्रकरण : घरझडतीत जप्त केल्या होत्या नवीन चलनी नोटा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. पी. गायकवाड यांच्या न्यायालयाने लाच प्रकरणातील आरोपी वन परिक्षेत्र अधिकारी अशोक काशिराम माकडे यांची १२ लाख ४३ हजार ७८० रुपयांच्या सुपूर्दनाम्याची मागणी फेटाळून लावली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी)१५ मार्च २०१७ रोजी सापळा रचून अशोक माकडे यांना कंत्राटदार गजानन महाजन यांच्याकडून ३ लाखांची लाच घेताना रंगेहात अटक केली होती. एसीबीच्या पथकाने त्यांच्या हिंगणा भागातील संत गाडगेनगर येथील घराची झडती घेतली असता १२ लाख ४३ हजार ७८० रुपयांच्या नवीन चलनी नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. कारवाई दरम्यान त्यांना या नोटांबाबत स्पष्टीकरण मागण्यात आले असता त्यांनी ‘माझी मानसिक स्थिती अत्यंत खराब आहे. काहीही सुचत नाही. काही आठवत नाही, त्यामुळे स्पष्टीकरण देऊ शकत नाही’, असे म्हटले होते. माकडे यांनी जप्त रक्कमेच्या सुपूर्दनाम्यासाठी न्यायालयात अर्ज केला. आपल्या नातेवाईकांनी आपणास जमीन खरेदी करण्यासाठी वेळोवेळी ५ हजार, १० हजार, १५ हजार, ४ हजार, २० हजार, अशा स्वरूपात या रकमा बँकांमधून काढून दिल्या होत्या. त्यापैकीच ही रक्कम होती, असे त्याने अर्जात नमूद केले. यावर सरकार पक्षाने न्यायालयाच्या असे निदर्शनास आणून दिले की, ८ नोव्हेंबर २०१६ पासून संपूर्ण देशभरात नोटाबंदी होती. कॅशलेस व्यवहाराबाबत जनजागृती होत होती. घरखर्चासाठी मर्यादित व तुटपुंजी रक्कम बँक आणि एटीएममधून काढता येत होती, अशा वेळी नातेवाईकांनी त्यांच्या दैनंदिन गरजा भागवणे सोडून माकडे यांना जमीन खरेदीसाठी नवीन चलनातील इतकी मोठी रक्कम हातउसनी दिली हे अशक्य वाटते. त्यामुळे माकडे यांचा सुपूर्दनाम्याचा अर्ज फेटाळण्यात यावा, अशी विनंती सरकार पक्षाने युक्तिवाद करताना केली. न्यायालयाने सरकार पक्षाचे म्हणणे ग्राह्य धरून माकडे यांचा अर्ज फेटाळून लावला. न्यायालयात सरकारच्यावतीने सहायक सरकारी वकील सुनिता खोब्रागडे यांनी बाजू मांडली. या प्रकरणाच्या तपास अधिकारी पोलीस उपअधीक्षक अश्विनी भोसले या आहेत.