शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात ऑक्सिमीटर, थर्मल स्कॅनरची डिमांड वाढली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 20:03 IST

कोरोना रुग्णांना सौम्य लक्षणे असल्यास त्यांना होम आयसोलेशनचा सल्ला शासनातर्फे देण्यात येत आहे. अशा रुग्णांची संख्या वाढत असून त्यासोबतच घरीच शरीराचे तापमान आणि ऑक्सिजनचा स्तर मोजण्यासाठी लोकांकडून थर्मल स्कॅनर (इन्फ्रारेड टेम्परेचर गन) आणि पल्स ऑक्सिमीटरची मागणी वाढली आहे.

ठळक मुद्देप्रादुर्भाव वाढल्याने काळजीवर भर : कंपनीनुसार वेगवेगळ्या किमती, सहज उपलब्ध

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना रुग्णांना सौम्य लक्षणे असल्यास त्यांना होम आयसोलेशनचा सल्ला शासनातर्फे देण्यात येत आहे. अशा रुग्णांची संख्या वाढत असून त्यासोबतच घरीच शरीराचे तापमान आणि ऑक्सिजनचा स्तर मोजण्यासाठी लोकांकडून थर्मल स्कॅनर (इन्फ्रारेड टेम्परेचर गन) आणि पल्स ऑक्सिमीटरची मागणी वाढली आहे. कोरोनापूर्वी १० ते २० च्या संख्येत विकणारे ऑक्सिमीटर आता तुलनात्मरीत्या ४०० पेक्षा जास्त विकले जात आहेत. लोकांमध्ये आरोग्याप्रति जागरूकता वाढल्याने या उपकरणांची विक्री वाढल्याचे औषध विक्रेत्यांनी सांगितले.कोरोना रुग्णाव्यतिरिक्त कोरोना नसलेले लोकही घरी तापमान आणि ऑक्सिजन स्तर मोजण्यासाठी या दोन्ही उपकरणांची मोठ्या प्रमाणात खरेदी करीत आहेत. आता लोकांमध्ये आरोग्याप्रति जागरूकता वाढली आहे. सध्या थर्मल स्कॅनरची विक्री कमी झाली, पण ऑक्सिमीटरची विक्री जवळपास दहा पटीने वाढली आहे. लोक आता खिशातच ऑक्सिमीटर घेऊन चालत आहेत. प्रत्येक घरात ही उपकरणे आता जीवनाचे अंग बनले आहे.एप्रिल आणि मे महिन्यात थर्मल स्कॅलरची मागणी वाढली होती. बाजारात उपलब्धता नसल्याने या उपकरणाची ८ हजार रुपयांपर्यंत विक्री झाली होती. पण आता हेच उपकरण कंपनीनुसार १००० ते १४०० रुपयांत बाजारात सहजरीत्या उपलब्ध आहेत. याशिवाय सहज उपलब्ध असलेले ऑक्सिमीटर ५०० ते २५०० रुपयांपर्यंत विक्रीस आहेत. मागणीपेक्षा जास्त स्टॉक मेडिकल स्टोअर्समध्ये उपलब्ध आहे. पूर्वीच्या तुलनेत कमी किमतीत मास्क आणि सॅनिटायझरही लोकांना मिळत आहे. आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांतर्फे घेण्यात येत असलेल्या औषधीचा किती फायदा होत आहे, हे ऑक्सिमीटरवरून कळते, असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले.फार्मा आणि नॉन-फार्मा दुकानात उपलब्धही दोन्ही उपकरणे फार्मासह नॉन फार्मा दुकानांमध्येही विक्रीस आहेत. शहरातील इलेक्ट्रॉनिक्स दुकानांमध्येही सहजरीत्या मिळत आहेत. उपलब्धता वाढल्याने या उपकरणांच्या किमती कमी झाल्या आहेत. पूर्वी ही उपकरणे चीनमधून आयात व्हायची, पण आता भारतात मोठ्या प्रमाणात उत्पादन होत आहे. यावर गॅरंटी आणि वॉरंटीही देण्यात येत आहे. त्यामुळे वाढत्या किमतीवरही आळा बसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.जागरूकतेने उपकरणांची मागणी वाढलीकोरोना महामारीनंतर लोक आरोग्याप्रति जागरूक झाले असून होम आयसोलेशन असलेले रुग्ण घरीच शरीराचे तापमान आणि आॅक्सिजन स्तर मोजण्यासाठी पल्स ऑक्सिमीटर आणि थर्मल स्कॅनर खरेदी करीत आहे. पूर्वीच्या तुलनेत दोन्ही उपकरणे बाजारात किफायत किमतीत सहजरीत्या उपलब्ध आहेत. लोकांना परवडणारे आहेत. सध्या नागपूर जिल्ह्यात ऑक्सिमीटरची दररोज ४०० पेक्षा जास्त संख्येत विक्री होत आहे. तुलनात्मरीत्या थर्मल स्कॅनरची विक्री कमी झाली आहे. सामान्य लोकांमध्ये आरोग्य तपासणीची जणू स्पर्धाच लागली आहे.हेतल ठक्कर, सचिव, नागपूर जिल्हा केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर