शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

हिरणवार ले-आऊटमध्ये मिळाल्या डिमांड नोट

By admin | Updated: August 29, 2014 00:59 IST

दक्षिण-पश्चिम नागपुरातील जयताळा परिसरातील कार्गो प्रकल्पाच्या आरक्षणामुळे व यूएलसीच्या आरक्षणामुळे नियमितीकरणापासून वंचित असलेल्या हिरणवार ले-आऊट येथील नागरिकांना

नागपूर : दक्षिण-पश्चिम नागपुरातील जयताळा परिसरातील कार्गो प्रकल्पाच्या आरक्षणामुळे व यूएलसीच्या आरक्षणामुळे नियमितीकरणापासून वंचित असलेल्या हिरणवार ले-आऊट येथील नागरिकांना अखेर दिलासा मिळाला आहे. आ. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येथील नागरिकांना डिमांड नोट वितरित करण्यात आल्या. जयताळा परिसरातील हिरणवार ले-आऊट हा भाग मिहानच्या आरक्षणामध्ये होता. यूएलसीचेही आरक्षण होते. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना सोयीसुविधांसाठी बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत होता. या भूखंडाचे नियमितीकरणासंदर्भात अनिश्चिततेचे वातावरण होते. बहुतांश भूखंडांवर घरे बांधण्यात आलेली आहेत. नागरिकांना कोणत्याही प्रकारचा दिलासा मिळत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु आ.देवेंद्र फडणवीस यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा करीत हा भाग मिहानच्या तसेच यूएलसीच्या आरक्षणातून वगळून घेतला. नागपूर सुधार प्रन्यासतर्फे या ले-आऊटला गुंठेवारी कायद्यांतर्गत मंजुरी दिली व त्याच्या डिमांड नोटही वितरित करण्यात आल्या आहेत. यामुळे हिरणवार ले-आऊटमधील १५२ रहिवाशांना मोठा दिलासा यामुळे मिळाला आहे . हिरणवार ले-आऊटमधील हनुमान मंदिराच्या वॉल कम्पाऊंडचे बांधकाम आ. फडणवीस यांच्या स्थानिक विकास निधीतून होणार असून, त्याही कामाचे भूमिपूजन तसेच झाडे ले-आऊटमधील रस्त्याच्या खडीकरणाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. डिमांड नोट वाटपाच्या कार्यक्र माला आ. देवेंद्र फडणवीस यांच्यासह दक्षिण-पश्चिम भाजप मंडळाचे अध्यक्ष विजय राऊत, किशोर वानखेडे, नितीन तेलगोटे, दिलीप दिवे, नेहारे, सुधाकरराव मडके, अशोक ठाकरे, महेंद्र भार्गव, लहू बेहते, भीमराव भागानगरे, विजय जामगडे, राहुल दुरबुले, राम कडू, रवी शेंडे, घोडे, सुरेश राऊत, अनुसूयाताई भोगे, विवेक बापट, चंद्रशेखर मेश्राम, सचिन शेंडे, मयूर गोमासे, सौरभ भार्गव, प्रफुल भोगे, प्रवीण सावरकर, महेंद्र ठाकरे, प्रफुल पंचभाई, सतीश मोरे, अजय कटरे, भुवनेश्वर शेंडे, मोरेश्वर झिले, रमेश हटवार, सुधाकर चरपे, मुकुंद घुगरे, दत्ता भुसारी, प्रशांत आकांत, प्रभाकर वानखेडे, दिलीप झोपे, सुभाष ठाकरे, विष्णू डहाके, संजय धोटे, प्रेम भानखेडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)