शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

महाराज बाग प्राणिसंग्रहालयाच्या मान्यतेसाठी केंद्राकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 00:05 IST

प्राणिसंग्रहालयाच्या मान्यतेसाठी महाराज बाग व्यवस्थापनाने केंद्र सरकारकडे मागणी केली आहे. केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाच्या माध्यमातून केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडे (सीझेडए) अपील करण्यात येणार आहे. ‘सीझेडए’ने २ डिसेंबर २०१८ रोजी महाराज बाग व्यवस्थापनाला मेल पाठवून मान्यता रद्द करण्यात आल्याची माहिती दिली होती. त्यामुळे नवीन वर्षापासून महाराज बाग प्राणिसंग्रहालयाचे संचालन मान्यतेविना खरंच करता येईल का, असा सवाल उपस्थित झाला आहे.

ठळक मुद्देबायोलॉजिस्ट व एज्युकेशन अधिकाऱ्याची नियुक्ती : पेयजल व्यवस्थेवर भर द्यावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्राणिसंग्रहालयाच्या मान्यतेसाठी महाराज बाग व्यवस्थापनाने केंद्र सरकारकडे मागणी केली आहे. केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाच्या माध्यमातून केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडे (सीझेडए) अपील करण्यात येणार आहे.‘सीझेडए’ने २ डिसेंबर २०१८ रोजी महाराज बाग व्यवस्थापनाला मेल पाठवून मान्यता रद्द करण्यात आल्याची माहिती दिली होती. त्यामुळे नवीन वर्षापासून महाराज बाग प्राणिसंग्रहालयाचे संचालन मान्यतेविना खरंच करता येईल का, असा सवाल उपस्थित झाला आहे.मंगळवारी नवीन वर्षात नागपूर आणि लगतच्या भागातील हजारो मुले आपल्या कुटुंबीयांसह महाराज बाग प्राणिसंग्रहालयात फिरायला आले होते. अनेक वर्षांपासून संपूर्ण विदर्भातील लाखो कुटुंबीय मुलांसह कमी शुल्कात वाघ, बिबट, अस्वल, मगर या सारखे वन्यप्राणी पाहायला येतात. पण काही दिवसांपासून महाराज बागची मान्यता रद्द झाल्याच्या वृत्ताने लोक प्राणिसंग्रहालयाबाबत चिंतित आहेत. काही आवश्यक सुधारणा आणि नवेजुने कागदपत्रांसह केंद्र सरकारकडे मान्यतेचा कालावधी वाढविण्यासाठी अपील करण्यात येणार असल्याचा दावा महाराज बाग व्यवस्थापनाने केला आहे.सीझेडएच्या आदेशानुसार व्यवस्थापनाने पेयजल, पक्ष्यांची जागा वाढविण्यासह प्राणिसंग्रहालयाच्या अ‍ॅक्वेरियममध्ये सुधारणा केली आहे. तसेच १२ डिसेंबरला बायोलॉजिस्ट आणि एज्युकेशन अधिकाऱ्यांची मुलाखत घेऊन नियुक्तीही करण्यात आली आहे. प्राणिसंग्रहालयातील कर्मचाऱ्यांचा आरोग्य अहवाल आदी अपीलला जोडून केंद्र सरकारकडे पाठविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.‘मास्टर प्लॅन’ला मंजुरी केव्हा?गेल्या काही वर्षांपासून सीझेडएची मान्यता डिसेंबरला समाप्त झाल्यानंतर महाराज बाग प्राणिसंग्रहालयातील त्रुटी दूर करण्याच्या अटीवर पुन्हा एक वर्षासाठी वाढ मिळत आहे. पण बायोलॉजिस्ट, एज्युकेशन अधिकारी आणि अन्यची नियुक्ती होत नव्हती. सीझेडए काही पायाभूत सुविधा नव्याने करण्यासाठी निर्देश देत राहिले. पण ‘मास्टर प्लॅन’ सीझेडएकडे मंजुरीसाठी चार वर्षांपूर्वीच पाठविल्याचे व्यवस्थापनाने सांगितले. अनेकदा प्लॅन परत आल्यानंतर आवश्यक सुधारणांसह पाठविण्यात आला. मास्टर प्लॅनला मंजुरी मिळाल्यानंतरच पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यात येणार असल्याचे महाराज बाग व्यवस्थापनाने सांगितले.प्रक्रिया सहा महिने सुरू राहणारकाही दिवसांपासून महाराजबाग प्राणिसंग्रहालयाला पुन्हा मान्यता मिळाल्याचे वृत्त व्हायरल होत आहे. या वृत्ताची शहानिशा करण्यासाठी सीझेडएशी जुळलेल्या अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही. पण महाराजबाग व्यवस्थापनाने मान्यतेचा कालावधी वाढविण्यात आल्याच्या वृत्ताचा इन्कार केला. महाराष्ट्र प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनीही महाराजबाग मान्यतेसंबंधित काही सूचना आल्याची माहिती नसल्याचे सांगितले. पण अपील केल्यानंतर सीझेडएची चमू नागपुरात येऊन निरीक्षण करणार आहे. ही प्रक्रिया सहा महिने सुरू राहणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.सरकारकडे पाठविले अपील : पार्लावारपंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयाचे सहायक अधिष्ठाता आणि प्राणिसंग्रहालयाचे नियंत्रक डॉ. एन. डी. पार्लावार यांनी सांगितले की, महाराजबाग प्राणिसंग्रहालयाच्या मान्यतेसाठी आवश्यक कागदपत्रांसह केंद्र सरकारकडे अपील केले आहे. सीझेडएच्या निर्देशानुसार बायोलॉजिस्ट व एज्युकेशन अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे.

 

 

टॅग्स :Maharajbagh Nagpurमहाराजबाग नागपूरCentral Governmentकेंद्र सरकार