शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

लखमापूर प्रकल्पासाठी ५० कोटींची मागणी

By admin | Updated: April 16, 2017 01:59 IST

हिंगणा तालुक्यातील लखमापूर लघुपाटबंधारे प्रकल्पाचे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून ५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाल्यास हा प्रकल्प प्राधान्याने पूर्ण होऊ शकेल.

चंद्रशेखर बावनकुळे : उद्योगमंत्र्यांसोबत मुंबई येथे लवकर बैठकनागपूर : हिंगणा तालुक्यातील लखमापूर लघुपाटबंधारे प्रकल्पाचे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून ५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाल्यास हा प्रकल्प प्राधान्याने पूर्ण होऊ शकेल. या प्रकल्पांतर्गत उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्यासोबत मंत्रालयात विशेष बैठक आयोजित करण्यात येऊन निधीची मागणी करण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे दिली. हिंगणा तालुक्यातील लखमापूर लघुपाटबंधारे प्रकल्पासंदर्भात रविभवन येथे पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती त्याप्रसंगी ते बोलत होते. आ. समीर मेघे, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता चव्हाण, अधीक्षक अभियंता इंगळे, कार्यकारी अभियंता पाटील, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी संगीतराव, कार्यकारी अभियंता एन. एस. मांडवे आदी यावेळी उपस्थित होते.लखमापूर या लघुपाटबंधारे प्रकल्पातून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला ३ एमएम क्यूब पाणी उपलब्ध होणार असून २६० हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे. या प्रकल्पासंदर्भात सुधारित प्रशासकीय मान्यता मिळविण्यासाठी एमआयडीसीकडून औद्योगिक क्षेत्राला पाण्याचे आरक्षण होत असल्यामुळे निधी उपलब्ध झाल्यास अपूर्ण प्रकल्प पूर्ण करणे सुलभ होणार आहे. त्यामुळे एमआयडीसीकडून निधी मिळविण्यासाठी उद्योग मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांचा आढावा घेताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, अपूर्ण असलेले मध्यम प्रकल्प तातडीने पूर्ण करण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करा. त्यानुसार निधीची मागणी करण्यात यावी. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ देण्यासाठी या प्रकल्पांना गती देण्यात यावी, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.(प्रतिनिधी)