नागपूर : केंद्र सरकारने डाळींच्या साठवणुकीवर टाकलेल्या मर्यादेच्या विरोधात देशभरातील कृषी बाजारपेठा शुक्रवारी बंद होत्या. या देशव्यापी बंदच्या समर्थनार्थ कळमना धान्य बाजारही बंद होता. यावेळी अडतिया आणि धान्य व्यापाऱ्यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाचा विरोध केला.
कळमना धान्यगंज अडतिया मंडळाचे अध्यक्ष अतुल सेनाड म्हणाले, स्टॉक मर्यादेचा निर्णय अयोग्य आहे. त्यामुळे धान्य व्यापारी, अडतिया आणि शेतकऱ्यांना अडचणी वाढणार आहेत. हा निर्णय तातडीने मागे घ्यावा. या मुद्द्यावर सर्व धान्य व्यापारी, अडतिया, शेतकरी, कामगारांनी एकजूट राहावे.
याप्रसंगी रामेश्वर हिरुळकर, कमलाकर घाटोळे, सारंग वानखेडे, रामदास गजापुरे, चिंटू पुरोहित, महेंद्र अग्रवाल, दिनेश चांडक, स्वप्निल वैरागडे, रहमान शेख, ज्ञानेश्वर गजभिये, राजेश सातपुते, शेखर अग्रवाल, मनोहर हजारे, सुरेश बारई, गोपाल कळमकर, पिंटू राऊत, भीमराव मुटे, स्वप्निल माटे, संजय अग्रवाल, मनीष घटे, विनोद कातुरे, दिनेश मौंदेकर, महादेव मेंढेकर, मनोज भालोटिया आदी अडतिये उपस्थित होते.