लाेकमत न्यूज नेटवर्क
माैदा : शहरातील पावडदाैना मार्गावरील लाेकवस्ती भागात दरराेज मांस-मच्छी बाजार भरताे. याठिकाणी ग्राहक रस्त्यावरच आपली वाहने उभी करून मटण-मच्छी खरेदी करतात. यामुळे रहदारीला अडसर ठरत असून, रस्त्याने ये-जा करणाऱ्यांना त्रास साेसावा लागताे. दुसरीकडे, लाेकवस्ती भागात अस्वच्छता व दुर्गंधीचा प्रश्न बिकट हाेत असून, यामुळे नागरिकांच्या आराेग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे येथील मांस-मच्छी बाजार इतरत्र हलविण्याची मागणी नागरिकांची आहे.
लाेकवस्तीत रस्त्याच्या कडेला भरणाऱ्या या बाजारात स्वच्छतेची समस्या दिवसेंदिवस तीव्र हाेत आहे. विक्रेते टाकाऊ मांसाची याेग्य विल्हेवाट लावत नसल्याने सायंकाळच्या सुमारास माेकाट कुत्री येथे ताव मारतात. ही कुत्री लगतच्या घरात, अंगणात टाकाऊ मांस आणतात. दुर्गंधी व किळसवाण्या प्रकारामुळे नागरिकांना नाहक त्रास साेसावा लागताे. त्यामुळे येथील मटण-मच्छी बाजार इतरत्र हलविण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या समस्येबाबत नागरिकांनी तहसील प्रशासनाला अवगत केले. मात्र अद्यापही त्यावर काहीही उपाययाेजना केल्या नाहीत.
...
नियमांना तिलांजली
काेराेना पार्श्वभूमीवर शासनाने दिशानिर्देशित केलेल्या नियमांना तिलांजली मिळत आहे. मांस विक्रेत्यांनी किमान १० फुटाचे अंतर ठेवून आपली दुकाने लावावीत, मास्कचा वापर करावा, गर्दी करू नये आदींबाबत जनजागृती करण्यात आली. सुरुवातीला काही दुकानदारांकडून दंडही वसूल केला गेला.
दरम्यान, परिसरातील नागरिकांनी मांस विक्रेत्यांमुळे हाेणाऱ्या त्रासाबाबत तहसीलदारांकडे समस्या मांडली. यावर तातडीने निर्णय घेऊन मार्ग काढण्याचे आश्वासन देण्यात आले. परंतु अद्यापही काेणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये असंताेष व्यक्त हाेत आहे.