शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पार्किंगच्या जागेवरील अतिक्रमणे हटवा

By admin | Updated: October 16, 2015 03:08 IST

न्यायालयाने ८ आॅक्टोबर रोजी दिलेले निर्देश केवळ धंतोली परिसरापुरते होते. आता न्यायालयाने निर्देशांचे क्षेत्र वाढविण्याचा निर्णय घेऊन हे नव्याने निर्देश दिले.

हायकोर्टाचे आदेश : सहा आठवड्यांची मुदतन्यायालयाने ८ आॅक्टोबर रोजी दिलेले निर्देश केवळ धंतोली परिसरापुरते होते. आता न्यायालयाने निर्देशांचे क्षेत्र वाढविण्याचा निर्णय घेऊन हे नव्याने निर्देश दिले. न्यायालयाने संबंधित महानगर प्राधिकाऱ्यांना असेही निर्देश दिले की, शहरातील १० झोनपैकी प्रत्येक झोनमध्ये एक पथक नेमले जावे. या पथकांमार्फत बेकायदेशीर अतिक्रमणे हटवून पार्किंगच्या जागा स्वच्छ करण्यात याव्या. मनपा आयुक्तांनाही असे निर्देश देण्यात आले आहे की, अतिक्रमणधारकाने अतिक्रमणे हटवली नाही तर त्याला गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशा आशयाच्या इशारा देणाऱ्या जाहीर नोटीस वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध करण्यात याव्यात. त्यानंतर कोणतीही पूर्वसूचना न देता ही अतिक्रमणे नेमून दिलेल्या कालावधीत काढून टाकली जावी. धंतोली नागरिक मंडळाच्यावतीने दाखल करण्यात आलेली जनहित याचिका गुरुवारी सुनावणीसाठी आली असता न्यायालयाने हे निर्देश दिले. या यचिकेद्वारे येथील नागरिकांनी आपली अशी कैफियत मांडली होती की, डॉक्टरांनी उघडलेल्या क्लिनिक आणि इस्पितळांच्या वाढत्या गर्दीमुळे नागरिकांना श्वास घेणे मुश्कील झाले आहे. या गर्दीमुळे सहजपणे जगण्यासाठी मोकळी जागा कमी झालेली आहे. न्यायालयाने या याचिकेवर गत ८ आॅक्टोबर रोजी निर्देश दिले होते. त्यावर मनपाच्यावतीने कार्यवाही अहवाल दाखल करण्यात आला होता. अहवालात अतिक्रमण झालेल्या काही ठिकाणांची छायाचित्रे होती. १९ ठिकाणांचे निरीक्षण केल्याचा आणि काही बेकायदेशीर बांधकामे पाडून संबंधितांकडून दंड वसूल केल्याचाही या अहवालात उल्लेख होता. अतिक्रमणे काढून घेण्याच्या न्यायालयांच्या निर्देशांबाबत अत्यंत सावध राहावे, निर्देशांचा गैरफायदा घेऊ नये, असा इशाराही न्यायालयाने दिला. न्यायालयात याचिकाकर्त्यांच्या वतीने अ‍ॅड. ए. सी. धर्माधिकारी, मनपाच्यावतीने अ‍ॅड. सुधीर पुराणिक, नासुप्रच्यावतीने अ‍ॅड. एस. के. मिश्रा, प्रतिवादी आणि मध्यस्थांच्यावतीने अ‍ॅड. आनंद परचुरे, राहील मिर्झा, अ‍ॅड. भानुदास कुळकर्णी, अ‍ॅड. अरुण अग्रवाल, अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)