शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

अधिष्ठाता गजभियेंच्या निलंबनाचा प्रस्ताव

By admin | Updated: January 20, 2017 02:16 IST

औषध पुरवठादाराकडून १५ हजारांची लाच मागितल्याप्रकरणी अटक झालेल्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो)

मेयो : अनुराधा श्रीखंडे यांच्याकडे रुग्णालयाची जबाबदारीनागपूर : औषध पुरवठादाराकडून १५ हजारांची लाच मागितल्याप्रकरणी अटक झालेल्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये (वाहणे) यांच्या निलंबनाचा प्रस्ताव गुरुवारी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने (डीएमईआर) मुख्यमंत्र्यांकडे पाठविला. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत यावर निर्णय होऊ शकला नाही.टिमकी गोळीबार चौक येथील औषध पुरवठादार आशिष मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्सचे मालक यांनी मेयो इस्पितळाला केलेल्या औषध पुरवठ्याच्या २ लाख ९४ हजार ६६० रुपयांच्या देयकाच्या मंजुरीसाठी अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांनी १५ हजाराच्या लाचेची मागणी केली होती. १६ जानेवारी रोजी ही लाच डॉ. गजभिये यांनी वसतिगृहातील खानावळ चालविणारा विजय मिश्रा याच्यावतीने मागितल्याचा आरोप करून सापळा रचण्यात आला होता. या प्रकरणात एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले होते. सापळ्याची कारवाई पूर्ण होईपर्यंत रात्र झाल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार त्यांना अटक न करता १७ जानेवारी रोजी सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) कार्यालयात हजर होण्याबाबत सूचनापत्र देण्यात आले होते. मंगळवारी डॉ. गजभिये यांनी नेहमीनुसार सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास रुग्णालयाचा दौरा केला.‘डीएमईआर’ला झालेल्या प्रकाराची लेखी माहिती लिहिली. परंतु गजभिये यांंनी एसीबी कार्यालयात हजर होण्याचे टाळून अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. गजभिये यांना अटक करण्यासाठी एसीबीची वेगवेगळी पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आली होती. बुधवारी त्या दुपारी ३ वाजताच्या सुमारास एसीबीच्या कार्यालयात शरण आल्या. त्यांना रीतसर अटक करण्यात आली. गुरुवारी डॉ. गजभिये यांना एक दिवसाच्या पोलीस कोठडी रिमांडवर पाठविण्यात आले. यादरम्यान रुग्णालयाची जबाबदारी गुरुवारी डॉ. अनुराधा श्रीखंडे यांच्याकडे सोपविण्यात आली. याला गंभीरतेने घेत डीएमईआरने दुपारीच डॉ. मीनाक्षी गजभिये यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठविला. परंतु सायंकाळी ६ वाजेपर्यंत याबाबत निर्णय होऊ शकला नव्हता. (प्रतिनिधी)घरात पाच लाख वेतनडॉ. मीनाक्षी गजभिये यांचे पती शासकीय सेवेतृन निवृत्त झाले आहेत. त्यांना निवृत्ती वेतन म्हणून ८० हजार रुपये मिळतात. निवृत्तीनंतर ते नाशिक येथील खासगी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सेवा देत आहेत. तिथे त्यांना दोन लाख रुपये मानधन मिळते, तर डॉ. मीनाक्षी गजभिये यांना अधिष्ठाता म्हणून २ लाख १० हजार रुपये वेतन मिळते. साधारण पाच लाख रुपये घरी वेतन येते. असे असताना डॉ. गजभिये यांनी केलेली १५ हजाराच्या लाचेच्या मागणीला घेऊन उलटसुलट चर्चेला पेव फुटले आहे. डॉ. मीनाक्षी गजभिये यांना बुधवारी अटक झाल्यानंतर मेयोचा कारभार मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांना दिला जाणार होता, परंतु डॉ. निसवाडे यांनी नकार दिल्यानंतर रुग्णालयातील वयोज्येष्ठतानुसार पॅथालॉजीच्या विभागप्रमुख डॉ. अनुराधा श्रीखंडे यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली. निलंबनाचा प्रस्ताव पाठविलामेयोच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांना बुधवारी अटक झाल्यानंतर गुरुवारी दुपारी त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात आला. त्यांच्या निर्णयानंतरच कारवाई होईल.-डॉ. प्रवीण शिनगारेसंचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग