शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अपयशाच्या पुस्तकातच यशाची व्याख्या

By admin | Updated: September 24, 2016 01:24 IST

लहानपणापासून आपण एक गोष्ट ऐकत आलो आहोत, ती म्हणजे अपयश ही यशाची पहिली पायरी आहे परंतु वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे.

सचिन बुरघाटे : शासकीय विज्ञान संस्थेतील प्रेरणादायी भाषणाने विद्यार्थ्यांत चैतन्यनागपूर : लहानपणापासून आपण एक गोष्ट ऐकत आलो आहोत, ती म्हणजे अपयश ही यशाची पहिली पायरी आहे परंतु वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे. अपयश हे संपूर्ण पुस्तक आहे. ज्याच्या शेवटच्या पानावर यश लिहिलेले आहे आणि ते वाचायचे असेल तर तुम्हाला संपूर्ण पुस्तक वाचावेच लागेल, अशा शब्दात आंतरराष्ट्रीय मोटिव्हेटर सचिन बुरघाटे यांनी शुक्रवारी विद्यार्थ्यांना यशाची खरी व्याख्या सांगितली. शासकीय विज्ञान संस्थेत पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड सॉफ्ट स्किल्स या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी मंचावर एफडीएचे प्रशासकीय अधिकारी डॉ. पी. एम.बल्लाळ, याच संस्थेचे माजी विद्यार्थी व आता आयएएस अधिकारी असलेले शंतनू गोतमारे, मी टू वूई फाऊंडेशनचे डॉ. प्रकाश इटनकर व संस्थेचे संचालक डॉ. रामदास आत्राम उपस्थित होते. याप्रसंगी या मान्यवरांच्या हस्ते करिअर कौन्सिलिंग सेल अ‍ॅण्ड प्लेसमेंट सेलचे उद्घाटन करण्यात आले. सचिन बुरघाटे यांनी पुढे आपल्या अनोख्या शैलीने विविध उदाहरणे सादर करीत विद्यार्थ्यांची मने जिंकली. अपयशावर कशी मात करायची यावर ते बोलत होते. अब्राहम लिंकन, धिरूभाई अंबानी, अमिताभ बच्चन या सर्व यशस्वी मान्यवरांनाही करिअरच्या सुरुवातीला मोठ्या अपयशाचा सामना करावा लागला. पण, केवळ जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर त्यांनी या जगात स्वत:ला सिद्ध केले. त्यामुळे सुरुवातीलाच मनात अपयशाची भीती बाळगून कुठल्याही कार्याची सुरुवात करू नका. मन सकारात्मक ठेवा. नजर सतत तुम्हाला हव्या असलेल्या संधीवर असू द्या व ती सापडली की पूर्ण क्षमतेने तिच्यावर तुटून पडा. तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील तर यशाला स्वत: तुमच्या पायाशी लोळण घालावी लागेल, असा आत्मविश्वास त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. त्यांच्या या भाषणाने विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळेच चैतन्य निर्माण केले. सभागृहात पाय ठेवायलाही जागा नसल्याने अनेकांनी तब्बल दोन तास हे प्रेरणादायी भाषण उभे राहून ऐकले. बुरघाटे यांचे भाषण संपल्यावरही बराच वेळ टाळ्यांचा कडकडाट सुुरू होता. तो या भाषणाच्या यशाची जणू फलश्रुतीच व्यक्त करीत होता.(प्रतिनिधी)