शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

स्फोटकांनी उडविताहेत डिफेन्सच्या टेकड्या

By admin | Updated: October 16, 2015 03:12 IST

कोराडीच्या मागील सुरादेवीमध्ये स्फोट करून डिफेन्सच्या टेकड्या खुलेआम उडविण्यात येत आहेत.

सुरादेवी कामठीतील घटना : पोलीस, महसूल, सेनेच्या अधिकाऱ्यांनी घेतला आढावायोगेंद्र शंभरकर नागपूरकोराडीच्या मागील सुरादेवीमध्ये स्फोट करून डिफेन्सच्या टेकड्या खुलेआम उडविण्यात येत आहेत. अवैधरीत्या स्फोट करून कोट्यवधी रुपयांच्या मुरुमाचे उत्खनन करण्यात येत आहे. प्रत्यक्षात मात्र सेनेच्या मुंबईतील इस्टेट आॅफिसकडून कंत्राटदाराला फक्त जमिनीवर पडलेल्या किंवा पारंपरिक शस्त्राने मुरुम काढण्याची परवानगी मिळाली आहे. संबंधित कंत्राटदारास कुठलाही विस्फोट न करण्याच्या अटीवर मुरुमाची वाहतूक करण्याचे काम देण्यात आले आहे. परंतु मागील काही दिवसांपासून खुलेआम मोठी स्फोटके वापरून मुरुमाचे उत्खनन करण्यात येत असून गुरुवारी सेना, प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून परिसरात दोन पोलिसांना तैनात केले आहे.विशेष बाब म्हणजे, या टेकड्यांच्या बाजूलाच सेनेच्या प्रशिक्षणार्थ्यांचे शिबिर आहे. येथे शेकडो युवक सैनिकाचे प्रशिक्षण घेत आहेत. याबाबत तक्रार मिळाल्यानंतर महसूल आणि सेनेचे अधिकारी घटनेच्या तपासासाठी पोहचत आहेत. या ठिकाणी नियमांना डावलून बेधडक होत असलेले उत्खनन पाहून महसूल विभाग आणि कामठी सेना कँटोनमेंटचे वरिष्ठ अधिकारी आश्चर्यचकित झाले आहेत. कागदपत्रांवर असलेल्या कंत्राटदार पवन मनीष शिंदे, कामठी याच्या मनमानीची माहिती मिळाल्यानंतर तो फरार झाला आहे. स्थानिक नागरिकांनुसार त्याच्या कृत्याची माहिती मिळाल्यानंतर श्रीराम सेनेचे पदाधिकारी रणजित सफेलकर आणि कार्यकर्त्यांनी बुधवारी कोराडी पोलीस, महसुल आणि सेनेच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. दरम्यान घटनास्थळी असलेले कर्मचारी, दोन क्रशर मशीनचे ट्रॅक्टर आणि वाहतूक करणारे दहा चाकांचे ट्रक तेथून बेपत्ता झाले आहेत. गुरुवारी सायंकाळी डिफेन्सच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरील जेसीबी मशीनला ताब्यात घेऊन तेथे पोलिसांना तैनात केले. याबाबत माहिती मिळताच गुरुवारी सायंकाळी गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त श्रीकांत तरवडे, कोराडीचे निरीक्षक रामकृष्ण महल्ले सुरादेवी गावात पोहोचले. परंतु त्यांनी घटनास्थळाचे निरीक्षण केले नाही. महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी राजेश निखार, पोलिसांच्या गुप्तहेर शाखेच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. कागदपत्रांशिवाय काही बोलणे अशक्यघटनेबाबत गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त श्रीकांत तरवडे यांनी सांगितले की, त्यांना फक्त अवैधरीत्या विस्फोट करून उत्खनन करण्याची माहिती मिळाली आहे. विनातक्रार आणि कागदपत्रांची पाहणी केल्याशिवाय मी काहीच बोलू शकत नाही.त्यांनी कोराडीच्या अधिकाऱ्यांना निविदेबाबत कागदपत्र आणि आरोपी कंत्राटदाराची माहिती घेण्याचे निर्देश दिले. तक्रार आल्यानंतर कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस निरीक्षक महल्ले यांनी यावेळी दिले.