शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

खुनी हल्ल्यातील आरोपीचा जामीन फेटाळला

By admin | Updated: June 17, 2017 02:15 IST

विवाहितेस पळवून नेल्याच्या वादातून झालेल्या एका खुनी हल्ल्यातील आरोपीचा जामीन अर्ज अतिरिक्त सत्र

विवाहितेस पळवून नेल्याच्या वादातून घडली होती घटना लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विवाहितेस पळवून नेल्याच्या वादातून झालेल्या एका खुनी हल्ल्यातील आरोपीचा जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. जी. रघुवंशी यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला. भेडन सकिंदर पुरवले(४२) रा. सत्रापूर कन्हान, असे आरोपीचे तर मिठाईलाल भिसे, असे जखमीचे नाव आहे. प्रकरण असे की, कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका विवाहितेला जखमी मिठाईलाल भिसे याचा पुतण्या अनिल भिसे याने पळवून नेले होते. नेमक्या याच कारणावरून १३ मे २०१७ रोजी विवाहितेचा नजीकचा नातेवाईक भेडन पुरवले याने अनिल भिसे याला गाठले होते. भेडन आणि अनिलमध्ये जोरदार भांडण सुरू असताना मिठाईलाल हा आरोपीला समजावण्यास गेला होता. त्यामुळे चिडून भेडन याने मिठाईलाल याच्या तोंडावर, डोक्यावर, गळ्यावर आणि पोटावर चाकूने वार करून गंभीररीत्या जखमी केले होते. मिठाईलाल याच्या तक्रारीवरून कन्हान पोलिसांनी भादंविच्या ३०७ कलमान्वये गुन्हा दाखल करून भेडन याला अटक केली होती. मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपी भेडन याने जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. जामिनास सरकार पक्षाकडून जबरदस्त विरोध करण्यात आला. आरोपी हा क्रूर स्वभावाचा असून त्याच्याविरुद्ध मारहाण व दुखापतीचे चार गुन्हे दाखल आहेत. तो कोणताही कामधंदा करीत नसून उलट मुलाच्या कमाईवर जगतो. त्याला जामिनावर सोडल्यास तो साक्षीदारांवर दबाव आणून फितवण्याची अधिक शक्यता आहे. न्यायालयाने सरकार पक्षाचे म्हणणे ग्राह्य धरून आरोपी भेडन पुरवले याचा जामीन अर्ज फेटाळून लावला. न्यायालयात सरकारच्या वतीने सहायक सरकारी वकील श्रीकांत गौळकर यांनी काम पाहिले. सहायक पोलीस निरीक्षक डी. आर. लोणारे हे या प्रकरणाचे तपास अधिकारी आहेत.