शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
3
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
4
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
5
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
6
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
7
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
8
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
9
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
10
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
11
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
12
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
13
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
14
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
15
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
16
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
17
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
18
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
19
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
20
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान

मुंडे यांच्या विरोधात ‘आप’चे धरणे

By admin | Updated: June 27, 2015 03:21 IST

भ्रष्टाचारमुक्त शासनाचे आश्वासन देणाऱ्या भाजप सरकारचे राज्यात एक वर्ष पूर्ण व्हायचे असतानाच

राजीनामा द्या : चौकशीची मागणी नागपूर : भ्रष्टाचारमुक्त शासनाचे आश्वासन देणाऱ्या भाजप सरकारचे राज्यात एक वर्ष पूर्ण व्हायचे असतानाच कोट्यवधी रुपयांचा चिक्की घोटाळा समोर आला आहे. कोट्यवधीचे कंत्राट विनानिविदा देण्यात आले. तसेच काळ्या यादीत टाकण्यात आलेल्या कंत्राटदारांना कंत्राट देण्यात आले. या एकूणच प्रकारणात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून असल्याचा आरोप करीत महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करीत आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी व्हेरायटी चौकात धरणे दिले.आम आदमी पार्टीचे विदर्भ संयोजक डॉ. देवेंद्र वानखेडे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात पंकजा मुंडे यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. पंकजा मुंडे यांनी सर्व नियम धाब्यावर बसवून एका दिवसात तब्बल २४ आदेश काढले. वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार हे तीन लाखावरील कामासाठी ई-टेंडरिंग करण्याची अट असल्याचे सांगत आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंडे यांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे या प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करावी तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगण्यात यावे, अशी मागणी या वेळी ‘आप’च्या पदाधिकाऱ्यांनी केली. आंदोलनात विदर्भ मीडिया संयोजक मंगेश तेलंग, नागपूर जिल्हा संयोजक अशोक मिश्रा, सहसंयोजक कविता सिंघल, प्रभात अग्रवाल, पीयूष आकरे, कृतल वेळेकर, ईश्वर गजबे, राजेश शेवळे, रवींद्र गिधोडे, मनोज वरघट, किरण वेल्लोर, चंद्रशेखर पराड, गीता कुहीकर व कार्यकर्ते उपस्थित होते.(प्रतिनिधी)