शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीत सदोष ‘अ‍ॅण्टी स्नेक व्हेनम’ लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 10:45 IST

नागपुरात मेडिकलमध्ये एका रुग्णाला ही लस दिली असता ‘रिअ‍ॅक्शन’ आली.  या लसीचा पुरवठा करणाऱ्या हाफकिन कंपनीच्या अधिकाऱ्याने शुक्रवारी मेडिकलला भेट देऊन लसीचे नमुने घेतले. अन्न व औषध प्रशासनही (एफडीए) याबाबत चौकशी करणार आहे.

ठळक मुद्दे रुग्णाला आली ‘रिअ‍ॅक्शन’रुग्णसेवेतून लसीचा साठा केला बाद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विषारी साप चावलेल्या रु ग्णाला वेळेत ‘अ‍ॅन्टी स्नेक व्हेनम’ इंजेक्शन जीवनदायी ठरते. परंतु मेडिकलमध्ये एका रुग्णाला ही लस दिली असता ‘रिअ‍ॅक्शन’ आली.  यामुळे तातडीने या लसीचा साठा रुग्णसेवेतून बाद केला. विशेष म्हणजे, या लसीचा पुरवठा करणाऱ्या हाफकिन कंपनीच्या अधिकाऱ्याने शुक्रवारी मेडिकलला भेट देऊन लसीचे नमुने घेतले. अन्न व औषध प्रशासनही (एफडीए) याबाबत चौकशी करणार आहे.देशात सर्पदंशाच्या दरवर्षी सुमारे दोन लाख घटना घडतात. त्यात सुमारे पंधरा हजार व्यक्ती दगावतात. यात साप चावल्याच्या धक्क्याने मरणाऱ्यांची संख्या मोठी असली तरी, वेळेत उपचार न मिळणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. पावसाळ्याच्या दिवसात सर्पदंश सर्वात जास्त होतात. विशेषत: ग्रामीण भागात सर्पदंशाचे प्रमाण मोठे आहे.यामुळे ‘अ‍ॅन्टी स्नेक व्हेनम’ लसीचा साठा जिल्हा सामान्य रु ग्णालयासोबतच प्राथमिक आरोग्य केंद्रात असावा, असे शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार मेडिकलमध्येही ही लस उपलब्ध करून दिली जाते. मेडिकलमध्ये महिन्याभरात १० ते १५ सर्पदंशाचे रुग्ण येतात. जून ते आॅक्टोबर महिन्यात या रुग्णांची संख्या वाढलेली असते. एका रुग्णाला दोनपेक्षा जास्त लस द्यावी लागते. यामुळे वर्षाला साधारण दोन ते चार हजार ‘अ‍ॅण्टी स्नेक व्हेनम’ची गरज भासते. या लसीचा पुरवठा करण्याचे देण्याचे अधिकार हाफकिन कंपनीला आहेत. याच कंपनीने पुरवठा केलेल्या एका बॅचमधील ‘अ‍ॅण्टी स्नेक व्हेनम’ लस सदोष आढळून आली.प्राप्त माहितीनुसार, गेल्या महिन्यात विषारी साप चावलेला पुरुष रुग्ण मेडिकलमध्ये दाखल झाला. त्याला ‘अ‍ॅण्टी स्नेक व्हेनम’ लस देण्यात आली. परंतु त्याला ‘रिअ‍ॅक्शन’ आले. तातडीने याची माहिती संबंधित डॉक्टरांनी औषधनिर्माणशास्त्र विभागाला दिली. त्यांनी संबंधित बॅचचा लसीचा साठा वेगळा करून रुग्णसेवेतून बाद केला. सूत्रानुसार, संबंधित बॅचच्या साधारण ५० ते ६० लस शिल्लक होत्या. याची माहिती हाफकिन कंपनीला देण्यात आली. शुक्रवारी कंपनीचा एका अधिकाऱ्याने मेडिकलला भेट देत लसीचा नमुना घेतला. याची माहिती अन्न व औषध प्रशासनालाही (एफडीए) देण्यात आल्याचे समजते.

‘रिअ‍ॅक्शन’ नव्हे ‘अ‍ॅबनार्मल रिस्पॉन्स’विषारी साप चावलेल्या रुग्णाला ‘अ‍ॅण्टी स्नेक व्हेनम’ लस दिली जाते. ही लस दिल्यानंतर ‘रिअ‍ॅक्शन’ येत नाही रुग्णाकडून ‘अ‍ॅबनार्मल रिस्पॉन्स’ मिळतो. ही सामान्य बाब आहे. तरीही याची गंभीर दखल घेऊन संबंधित बॅचचे ‘अ‍ॅण्टी स्नेक व्हेनम’ रुग्णसेवेतून बाद करण्यात आले. नवीन बॅचची लसही उपलब्ध करून देण्यात आली. पुरवठादार हाफकिन कंपनीला याची माहिती देण्यात आली असून ‘एफडीए’सुद्धा लसीचे नमुने घेणार आहे.-डॉ.विजय मोटघरेविभाग प्रमुखऔषधनिर्माणशास्त्र, मेडिकल

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय