शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात औषधांपासून मनोरुग्ण वंचित !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 00:06 IST

दररोजच्या ताणतणावांमुळे मनोरुग्णांची संख्या वाढत आहे. मनोरुग्णांवर तातडीने योग्य औषधोपचार केल्यास त्यांना सर्वसामान्यांसारखे आयुष्य जगता येते. मात्र, सरकारी अनास्थेमुळे प्रादेशिक मनोरुग्णालयाची अवस्था बिकट झाली आहे. बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) केवळ १० टक्केच औषधी आहेत, यातही अत्यंत आवश्यक असलेले ‘लोराझेपाम’, ‘डाईझेपाम’ व ‘क्लोनाझेपाम’ औषधेच नाहीत. विशेष म्हणजे, रुग्णालयात नसलेली औषधे लिहून देणे हे नियमबाह्य असल्याने रुग्ण औषधांपासून वंचित आहेत.

ठळक मुद्देप्रादेशिक मनोरुग्णालय : ओपीडीत केवळ १० टक्केच औषधी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दररोजच्या ताणतणावांमुळे मनोरुग्णांची संख्या वाढत आहे. मनोरुग्णांवर तातडीने योग्य औषधोपचार केल्यास त्यांना सर्वसामान्यांसारखे आयुष्य जगता येते. मात्र, सरकारी अनास्थेमुळे प्रादेशिक मनोरुग्णालयाची अवस्था बिकट झाली आहे. बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) केवळ १० टक्केच औषधी आहेत, यातही अत्यंत आवश्यक असलेले ‘लोराझेपाम’, ‘डाईझेपाम’ व ‘क्लोनाझेपाम’ औषधेच नाहीत. विशेष म्हणजे, रुग्णालयात नसलेली औषधे लिहून देणे हे नियमबाह्य असल्याने रुग्ण औषधांपासून वंचित आहेत. औषधेच नसल्याने मनोरुग्णांवर उपचार होणार कसा, हा प्रश्न आहे.प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या मनोरुग्णांची संख्या मोठी आहे. रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात रोज २५० वर रुग्ण येतात. यातील बहुसंख्य रुग्णांवर महिनोन्महिने उपचार करावे लागतात. गरीब मनोरुग्णांना खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणे परवडत नसल्याने त्यांच्यासाठी हे रुग्णालय आशेचा किरण आहे. परंतु लालफितशाहीचा मनमानी कारभार, अपुरा निधी, डॉक्टरांची कमतरता, पर्यायी उपचारांची वानवा अशा त्रुटींमुळे रुग्णसेवा प्रभावित झाली आहे. यातच गेल्या महिन्यापासून आवश्यक व तातडीने लागणारी औषधेही नसल्याने मनोरुग्णांचे हाल होत आहेत. सूत्रानुसार, रुग्णालय प्रशासनाने औषधांचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविला. परंतु आता औषधे खरेदीचे सर्व अधिकार ‘हाफकिन’ कंपनीला दिले असून, त्यांच्याकडून अद्यापही पुरवठा झाला नाही. स्थानिक पातळीवर औषधे खरेदीसाठीही अडचणी येत असल्याची माहिती आहे.-डॉक्टरांना औषधे लिहून देताही येत नाहीरुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या ८० टक्के रुग्णांना औषधे मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. परिणामी, रुग्णांवर कसे उपचार करावेत, असा प्रश्न डॉक्टरांना पडला आहे. रुग्णालयात नसलेली औषधे बाहेरून विकत घेण्यासाठी लिहूनही देता येत नाही, असे केल्यास रुग्ण ‘१०४’ क्रमांकावर तक्रारी करू शकतात. यामुळे रुग्ण रुग्णालयात येऊनही उपचाराविनाच राहात आहेत.

टॅग्स :mental hospitalमनोरूग्णालयmedicineऔषधं