शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दीपक बजाजच्या वैद्यकीय तपासणीत हयगय

By admin | Updated: October 28, 2016 02:47 IST

जरीपटक्यातील सिंधू एज्युकेशन सोसायटीचा सचिव व महात्मा गांधी सेंटेनियल सिंधू हायस्कूलचा मुख्याध्यापक

कारागृह अधिकाऱ्यांवर आरोप : विशेष न्यायालयात अर्ज दाखलनागपूर : जरीपटक्यातील सिंधू एज्युकेशन सोसायटीचा सचिव व महात्मा गांधी सेंटेनियल सिंधू हायस्कूलचा मुख्याध्यापक दीपक खूबचंद बजाजने त्याच्या स्वत:च्या आरोग्य तपासणीच्या बाबतीत कारागृह अधिकाऱ्यांकडून हयगय केली जात असल्याचा आरोप करून लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.बजाज भ्रष्टाचार, फसवणूक व गैरव्यवहार प्रकरणात आरोपी आहे. त्याच्याविरुद्ध विशेष न्यायालयात दोषारोप निश्चित करण्यात आले आहेत. बजाजला विविध आरोग्यविषयक समस्या भेडसावत आहेत. यामुळे विशेष न्यायालयाने बजाजची आरोग्य तपासणी करण्याचे निर्देश देऊन वैद्यकीय अहवाल मागवला होता. त्यानुसार बजाजची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यानंतर डॉक्टरने बजाजची नियमित वैद्यकीय तपासणी करीत राहणे आवश्यक असल्याचा अहवाल दिला. परंतु, कारागृह अधिकाऱ्यांनी या अहवालाकडे पूर्णत: दुर्लक्ष केले आहे. बजाजची नियमित वैद्यकीय तपासणी केली जात नाही. यामुळे त्याची प्रकृती खालावली आहे, असा दावा अर्जात करण्यात आला आहे. तसेच, यासंदर्भात कारागृह अधिकाऱ्यांना योग्य तो आदेश देण्याची विनंती न्यायालयाला करण्यात आली आहे. बजाजतर्फे अ‍ॅड. शशिभूषण वहाणे व अ‍ॅड. रसपालसिंग रेणू कामकाज पाहणार आहेत.(प्रतिनिधी)दोषारोपांवर आक्षेपदीपक बजाज व अन्य आरोपींविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या विशेष न्यायालयात खटला प्रलंबित आहे. बजाजविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम १३(१)(ई) व कलम १३(२) तर, भादंविच्या कलम ४६७, ४६८, ४७१, ४२०, १२०-ब व १६८ अंतर्गत दोषारोप निश्चित करण्यात आले आहेत. बजाजने फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम २१६ अंतर्गत विशेष न्यायालयात दुसरा अर्ज दाखल करून या दोषारोपांवर आक्षेप घेतला आहे. हे दोषारोप कायद्यानुसार नाहीत असे बजाजचे म्हणणे आहे. लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यातील कलम १३(१)(ई) आणि भादंवितील कलम १६८ व कलम १२०-ब अवैधपणे लावण्यात आले, असा दावा त्याने अर्जात केला आहे. मुलीच्या नावाने २५ लाख ७२ हजार ९०२ रुपयांची मालमत्ता आढळून आल्याचा आरोपही तथ्यहीन असल्याचे अर्जात नमूद करण्यात आले आहे. अ‍ॅड. शशिभूषण वहाणे व अ‍ॅड. रसपालसिंग रेणू या अर्जाचेही कामकाज पाहणार आहेत.