शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

दीपक बजाजची हायकोर्टात धाव

By admin | Updated: October 10, 2015 03:22 IST

भ्रष्टाचार करून कोट्यवधी रुपयांची अपसंपदा जमविणारा जरीपटक्यातील सिंधू एज्युकेशन सोसायटीचा सचिव व महात्मा गांधी सेंटेनियल सिंधू हायस्कूलचा....

अटकपूर्व जामीन अर्ज : शासनाला मागितले उत्तरनागपूर : भ्रष्टाचार करून कोट्यवधी रुपयांची अपसंपदा जमविणारा जरीपटक्यातील सिंधू एज्युकेशन सोसायटीचा सचिव व महात्मा गांधी सेंटेनियल सिंधू हायस्कूलचा मुख्याध्यापक दीपक खूबचंद बजाजने अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे. न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी शुक्रवारी बजाजच्या अर्जावर सुनावणी करून शासनाला १३ आॅक्टोबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत.लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश के. जी. राठी यांनी बजाजचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. यामुळे तो उच्च न्यायालयात आला आहे. बजाज हा पदाचा दुरुपयोग करून सोसायटीच्या सर्व शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांकडून विविध शुल्क वसूल करीत होता. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्याची नोकरी देण्याकरिताही त्याने लाखो रुपये घेतले. यामुळे २४ सप्टेंबर २०१५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी बजाजचे निवासस्थान, शाळा, कार्यालय व इतर ठिकाणी धाड टाकली. दरम्यान, अधिकाऱ्यांना १८ लाख १५ हजार ४९३ रुपये रोख व २ कोटी ६९ लाख १० हजार ३६५ रुपये किमतीचे घरगुती सामान अशी एकूण २ कोटी ८७ लाख २५ हजार ८५८ रुपये किमतीची मालमत्ता आढळून आली. पथकाने २९ सप्टेंबर रोजी सोसायटीचे कार्यालय व सिंधू एज्युकेशन कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयाची झडती घेतली असता गुप्त लॉकरमध्ये १३ लाख ८६ हजार ६१६ रुपयांची रोख रक्कम आढळून आली. २६ सप्टेंबर रोजी जरीपटका पोलिसांनी बजाजविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम १३ (१)(ई), १३ (२),१३ (१)(ड) अन्वये गुन्हा नोंदविला आहे. बजाजतर्फे वरिष्ठ वकील सुनील मनोहर तर, शासनातर्फे अतिरिक्त सरकारी वकील संजय डोईफोडे यांनी बाजू मांडली.