शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात रुग्णसंख्येत घट, मात्र संक्रमणाचा दर २६ टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:08 IST

सावनेर/काटोल/नरखेड/उमरेड/ कळमेश्वर/कुही/ कामठी/मौदा/ हिंगणा : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत असली तरी संक्रमणाचा दर २६ टक्क्यांवर ...

सावनेर/काटोल/नरखेड/उमरेड/ कळमेश्वर/कुही/ कामठी/मौदा/ हिंगणा : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत असली तरी संक्रमणाचा दर २६ टक्क्यांवर आहे. गुरुवारी मध्यरात्रीच्या अहवालानुसार तेरा तालुक्यांत ३२६२ संशयित रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत ८५१ (२६.०८ टक्के) रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. ग्रामीण भागात आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १,३४,९३५ इतकी झाली आहे. यातील २१५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारच्या अहवालानुसार ग्रामीण भागात २२ रुग्णांचा मृत्यू झाला तर २४७९ रुग्णांनी कोरोनावर मात केली. ग्रामीण भागात आतापर्यंत १,१४,८९१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १७,८१८ इतकी झाली आहे.

नरखेड तालुक्यात ८१ रुग्णांची भर पडली. यात नरखेड शहरातील २ तर ग्रामीण भागातील ७९ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २४५३ तर शहरातील ४९५ इतकी झाली आहे. जलालखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावात (४), मेंढला प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावात ७५ रुग्णांची नोंद झाली. काटोल तालुक्यात १४९ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत १४९ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात काटोल शहरातील ३ तर ग्रामीण भागातील १५ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात कचारी सावंगा केंद्रांतर्गत ६, कोंढाळी (५) तर येनवा केंद्रांतर्गत ४ रुग्णांची नोंद झाली. उमरेड तालुक्यात ५८ रुग्णांची नोंद झाली. यात शहरातील २१ तर ग्रामीण भागातील ३७ रुग्णांचा समावेश आहे.

कुही तालुक्यातील विविध केंद्रांवर १३९ नागरिकांच्या चाचण्यात करण्यात आल्या. तीत कुही व तितूर येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. रामटेक तालुक्यात ८ रुग्णांची भर पडली. यात रामटेक शहरात १ व ग्रामीण भागातील ७ रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यात आतार्पंत ६३८८ रुग्णांची नोंद झाली आहे. यातील ५८२८ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर १२३ जणांचा मृत्यू झाला. तालुक्यात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५६० इतकी आहे.

सावनेर तालुक्यात १५ रुग्णांची नोंद झाली. यात सावनेर शहरातील ७ तर ग्रामीण भागातील ८ रुग्णांचा समावेश आहे. कामठी तालुक्यात ७० रुग्णांची नोंद झाली. हिंगणा तालुक्यात २४७ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत ३६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात टाकळघाट येथे १२, वानाडोंगरी (५), डिगडोह व जुनेवानी प्रत्येकी ३, हिंगणा, घोडेघाट प्रत्येकी २, इसासनी, अडेगाव, संगम, गोंडवाना, खैरीमोरे , गणेशपूर, शिरूळ, टेंभरी व रायपूर येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या ११,२८५ झाली असून यातील १०,००६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

कळमेश्वर तालुक्यात कहर

कळमेश्वर तालुक्यात कोरोनाचा कहर सुरू आहे. शुक्रवारी तालुक्यात आणखी २२४ रुग्णांची भर पडली. यात कळमेश्वर-ब्राह्मणी शहरातील ६४ तर ग्रामीण भागातील १६० रुग्णांचा समावेश आहे.