शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

प्रलंबित खटल्यांचा भार कमी व्हावा

By admin | Updated: April 15, 2017 02:12 IST

न्यायालयांवरील प्रलंबित खटल्यांचा भार ही फार जुनी आणि मोठी समस्या राहिली आहे. यासाठी विविध कारणे कारणीभूत ठरत आहेत.

हायकोर्ट बार असोसिएशनचा पदग्रहणसमारंभ : न्या. बोबडे यांचे प्रतिपादन नागपूर : न्यायालयांवरील प्रलंबित खटल्यांचा भार ही फार जुनी आणि मोठी समस्या राहिली आहे. यासाठी विविध कारणे कारणीभूत ठरत आहेत. न्यायालयांवरील हा भार कमी करण्यासाठी वकिलांच्या सकारात्मक दृष्टिकोनासह पुढाकाराची गरज आहे. त्याशिवाय ही समस्या सुटूच शकत नाही, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी केले. नागपूर हायकोर्ट बार असोसिएशनच्या नवीन कार्यकारिणीचा शुक्रवारी पदग्रहण समारंभ पार पडला. यावेळी ते बोलत होते. सिव्हिल लाईन्समधील वसंतराव देशपांडे सभागृहात हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती भूषण गवई, राज्याचे महाधिवक्ता अ‍ॅड़ रोहित देव, हायकोर्ट बार असोसिएशनचे मावळते अध्यक्ष अ‍ॅड़ अरुण पाटील व सचिव श्रद्धानंद भुतडा यांच्यासह नवनियुक्त अध्यक्ष अ‍ॅड़ अनिल किलोर आणि सचिव प्रफुल्ल खुबाळकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करू न कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी न्या. बोबडे यांनी हायकोर्ट बार असोसिएशनच्या इतिहासाला ओझरता स्पर्श करीत, अध्यक्षांच्या निवडीविषयी माहिती दिली. शिवाय आज बारला अनेक अधिकार असून, त्या अधिकारांचा बार असोसिएशनने अनेकदा निर्भिडपणे उपयोगही केला असल्याचे ते म्हणाले. नागपूर हायकोर्ट बार असोसिएशनतर्फे नागपूर खंडपीठातील प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी नेहमीच सहकार्य मिळाले आहे. शिवाय भविष्यातही त्या प्रयत्नांची गरज आहे. हायकोर्ट बार असोसिएशन विदर्भातील एक महत्वाची संघटना आहे. त्यामुळे बार असोसिएशने विदर्भातील सर्व लहान संघटनांना एकत्रित करू न, त्यांचे नेतृत्व केले पाहिजे, अशी त्यांनी यावेळी अपेक्षा व्यक्त केली. याशिवाय बारने कनिष्ठ वकिलांना तयार करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. यासाठी प्रत्येक ज्येष्ठ वकिलांनी दहा कनिष्ठ वकिलांची जबाबदारी स्वीकारावी, असेही त्यांनी सुचविले. दरम्यान त्यांनी बार असोसिएशनच्या नवीन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते हायकोर्ट बार असोसिएशनच्या ‘स्टडी सर्कल’ या वार्षिकांकाचे प्रकाशनही करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन अ‍ॅड़ राधिका बजाज यांनी केले तर बार असोसिएशनचे नवनियुक्त सचिव अ‍ॅड. प्रफुल्ल खुबाळकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)