शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

कन्हान परिसरातील गुन्ह्यात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:09 IST

धनंजय कापसीकर लाेकमत न्यूज नेटवर्क कन्हान : गंभीर गुन्ह्यांमुळे कन्हान (ता. पारशिवनी) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील बहुतांश भाग हा संवेदनशील ...

धनंजय कापसीकर

लाेकमत न्यूज नेटवर्क

कन्हान : गंभीर गुन्ह्यांमुळे कन्हान (ता. पारशिवनी) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील बहुतांश भाग हा संवेदनशील गणल्या जाताे. या पाेलीस ठाण्याच्या हद्दीत १ जानेवारी ते डिसेंबर २०१९ या काळात १८२ विविध गुन्ह्यांची नाेंद करण्यात आली हाेती. हा आकडा २०२० मध्ये १७९ एवढा हाेता. त्यामुळे या पाेलीस ठाण्याच्या हद्दीत २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये १.६४ टक्के कमी गुन्ह्यांची नाेंद करण्यात आली आहे. परंतु, रेती व काेळसा चाेरीला आळा घालण्याचे आव्हान कायम आहे.

या पाेलीस ठाण्याच्या हद्दीत सन २०२० मध्ये २५० प्रतिबंधात्मक गुन्ह्यांची नाेंद करण्यात आली हाेती तर माेटार वाहन कायदा व ड्रंक ॲण्ड ड्राईव्हची १,८६२ प्रकरणे नाेंदविण्यात आली हाेती. या वर्षात रस्ते अपघातांमध्ये मृत्यू व जखमी हाेण्याचे प्रमाणही थाेडे घटले आहे.

या पाेलीस ठाण्याच्या हद्दीतून कन्हान नदी वाहात असल्याने तसेच वेकाेलिच्या काळसा खाणी असल्याने रेती व काेळसा चाेरीच्या घटना तांत्रिक कारणांमुळे पाेलिसांसाठी डाेकेदुखी ठरल्या आहेत. दुसरीकडे, कन्हान पाेलिसांनी घरफाेडी, चोरी, जबरी चोरी, दरोडा, जीवे मारण्याचा प्रयत्न, हत्या, अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळणे यासारख्या गंभीर घटना व गुन्ह्यांवर नियंत्रण मिळविण्यात कन्हान पाेलिसांना यश आले आहे.

गंभीर गुन्हे टाळण्यासाठी तसेच गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी गुन्हेगारांवर आधी प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते. त्यामुळे नागरिकांच्या मनातील भीती कमी हाेण्यास मदत हाेते. प्रतिबंधात्मक कारवाई करताना कलम १०७ मधील १५७, कलम ११० मधील २४, कलम १०९ मधील १७, कलम ५६ मधील ३, कलम ९३ मधील ७, कलम ११२ व ११७ मधील ११, कलम १२२ मधील ६ अशी एकूण २२५ प्रकरणे नाेंदविण्यात आली. या भागातील कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी २०२० मध्ये तडीपारचे तीन प्रस्ताव तयार करून ते पुढील कारवाईसाठी रामटेक उपविभागीय अधिकारी कार्यालयात पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती ठाणेदार अरुण त्रिपाठी यांनी दिली.

...

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा अभाव

गंभीर गुन्ह्यांच्या व अपघातांच्या तपासात ‘सीसीटीव्ही फुटेज’ महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना पाेलिसांचा तिसरा डाेळा संबाेधला जाताे. कन्हान पाेलीस ठाण्याचा बहुतांश परिसर संवेदनशील आहे. परंतु, या पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील महत्वाच्या ठिकाणी अद्यापही सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले नाहीत.

...

३० गावांचा समावेश

कन्हान पाेलीस ठाण्याच्या हद्दीत कन्हान शहर व परिसरातील ३० गावांचा समावेश करण्यात आला आहे. पूर्वी कामठी येथे असलेले उपविभागीय पाेलीस अधिकारी कार्यालयदेखील दाेन वर्षापूर्वी कन्हान शहरात स्थानांतरित करण्यात आले आहे. या भागात रेती व काेळसा चाेरी पूर्वीपासूनच फाेफावली आहे. ती नियंत्रणात आणण्यासाठी पाेलिसांना कसरत करावी लागत आहे.

...

गंभीर गुन्ह्यांमुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण होते. कायदा व सुव्यवस्था कायम राखणे आव्हानात्मक ठरते. नियाेजनबद्ध काम करीत गंभीर गुन्ह्यांवर नियंत्रण मिळविले आहे. या परिसरातील वेकाेलिच्या खाणींमधून काेळसा तर कन्हान नदीतून रेती चाेरी केली जात आहे. या चाेरीला आळा घालण्यासाठी याेग्य उपाययाेजना केल्या जात आहेत.

- अरुण त्रिपाठी,

ठाणेदार, कन्हान.

...