शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

संत विद्यापीठाबाबत घोषणा, मराठी विद्यापीठाचा निर्णय कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 20:27 IST

राज्य शासनाने पंढरपूर येथे संत विद्यापीठ उभारण्याचा निर्णय जाहीर केला असून त्यासाठी मार्गदर्शक समितीही नेमली आहे. इच्छा असल्यास शासन एखादा निर्णय किती तातडीने घेऊ शकते याचे प्रत्यंतर येणाऱ्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. मात्र गेल्या ८५ वर्षांपासून धूळखात पडलेल्या मराठी विद्यापीठ स्थापण्याच्या प्रस्तावाबाबतही अशीच तत्परता शासनाने दाखवावी, अशी इच्छा साहित्य वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्दे८५ वर्षांपासून प्रस्ताव धूळखात : साहित्य महामंडळाचे शासनाला स्मरणपत्र

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य शासनाने पंढरपूर येथे संत विद्यापीठ उभारण्याचा निर्णय जाहीर केला असून त्यासाठी मार्गदर्शक समितीही नेमली आहे. इच्छा असल्यास शासन एखादा निर्णय किती तातडीने घेऊ शकते याचे प्रत्यंतर येणाऱ्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. मात्र गेल्या ८५ वर्षांपासून धूळखात पडलेल्या मराठी विद्यापीठ स्थापण्याच्या प्रस्तावाबाबतही अशीच तत्परता शासनाने दाखवावी, अशी इच्छा साहित्य वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्यावतीने अध्यक्ष डॉ.श्रीपाद भालचंद्र जोशीयांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना स्मरणपत्र व निवेदन सादर केले आहे. १९३३ साली नागपुरात झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात (तेव्हाचे महाराष्ट्र साहित्य संमेलन) दत्तो वामन पोतदार यांनी सर्वप्रथम मराठी विद्यापीठाच्या मागणीचा ठराव मांडला होता. त्यावेळी त्याला महाराष्ट्र विद्यापीठ संबोधण्यात आले होते. तेव्हापासून मराठी साहित्यिकांना या मागणीसाठी संघर्ष करावा लागत आहे. पोतदार यांच्यानंतर डॉ. वि.भ. कोलते, प्रा. राम शेवाळकर, डॉ. भास्कर लक्ष्मण भोळे व आता डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा चालविला आहे. गेल्या ८५ वर्षापासून राज्याचा कारभार करणाऱ्या कोणत्याही पक्षाच्या शासनाला मराठी माणसाला अभिमान होईल, असा निर्णय घ्यावासा वाटला नाही, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल, अशी टीका केली जात आहे.विदर्भ साहित्य संघ व विदर्भ साहित्य संमेलनातून ठरावाद्वारे ही मागणी डॉ. जोशी यांनी सतत लावून धरली. पुढे त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांमधूनही या मागणीचे ठराव होतील असे बघितले. पाच वर्षांपूर्वी त्यांनी मराठी विद्यापीठाची संकल्पना व त्याचे नेमके स्वरूप या बाबतचे एक संक्षिप्त टिपणही शासनास सादर केले. गेल्या दोन वर्षांपासून महामंडळ विदर्भ साहित्य संघाकडे आल्यापासून महामंडळ अध्यक्ष या नात्याने डॉ. श्रीपाद जोशी यांनी मागणीला चळवळीचे रूप आणणारा दबाव निर्माण करण्यास जोरात सुरुवात केली आहे. नागरिक कृती समिती स्थापण्याचे प्रयत्नही त्यासाठी होत आहेत.विशेष म्हणजे ८५ वर्षे जुन्या या मागणीच्या संदर्भात बडोदा येथे झालेल्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रथमच मराठी विद्यापीठ स्थापनेबाबत शासन सकारात्मत्क असल्याचे जाहिररीत्या अभिवचन दिले होते.मात्र मुख्यमंत्र्यांचे हे अभिवचन अंमलबजावणीपर्यंत पोहचले नाही. महामंडळाने त्यानंतर दोनदा त्याबाबत स्मरणपत्रे पाठविल्याचे डॉ. श्रीपाद जोशी यांनी सांगितले. स्वंतत्र पत्राद्वारे हे अभिवचन तातडीने अमलात आणून मराठी विद्यापीठ स्थापनेसाठी राज्याने त्वरित शासकीय व अशासकीय सदस्यांची एक उच्चाधिकार समिती अविलंब नेमावी अशी सूचनाही शिक्षणमंत्री व मुख्यमंत्र्यांना केल्याचे त्यांनी सांगितले. संत विद्यापीठाच्या निर्णयानंतर मराठी विद्यापीठाच्या मागणीसाठी आता नव्याने महामंडळातर्फे मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांना स्मरणपत्र सादर केल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले.अभिजात दर्जाचे अभिवचनही खोळंबलेबडोदा येथे झालेल्या ९० व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनात १६ फेब्रुवारी रोजी मराठीच्या अभिजात दर्जाप्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधानांकडे एक शिष्टमंडळ न्यावे असा जो ठराव झाला होता. त्याला प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांनी भाषणात साहित्यिकांचे एक प्रतिनिधिमंडळ पंतप्रधानांकडे नेण्यात येईल असे जाहीर केले होते. त्याचेही स्मरण महामंडळाने पत्राद्वारे केल्याचे डॉ. जोशी यांनी स्पष्ट केले.इच्छाशक्ती असल्यास सरकार किती तातडीने एखादी मागणी पूर्ण करू शकते याचे प्रत्यंतर देणाऱ्या संत विद्यापीठाच्या निर्णयाचे आम्ही साहित्य महामंडळातर्फे मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांचे मनापासून अभिनंदन करतो. शासनाने अशीच तत्परता मराठी विद्यापीठाच्या स्थापनेबाबत आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी दाखवावी अशी एकूणच मराठी माणसांची अपेक्षा आहे आणि शसनाने ती पूर्ण करावी.डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, अध्यक्ष, अ.भा. मराठी साहित्य महामंडळ

टॅग्स :universityविद्यापीठmarathiमराठी