शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

विश्वस्त मंडळाच्या निर्णयाला नासुप्रचा ठेंगा

By admin | Updated: May 15, 2017 02:18 IST

नागपूर सुधार प्रन्यासकडून(नासुप्र)खरेदी करण्यात आलेल्या मालमत्तावर कर्ज घेण्यासाठी नासुप्रचे नाहरकत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक होते

लीज नूतनीकरणाची अट रद्द नाही : ग्राऊंड रेंटमध्ये तिपटीने वाढ गणेश हूड। लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर सुधार प्रन्यासकडून(नासुप्र)खरेदी करण्यात आलेल्या मालमत्तावर कर्ज घेण्यासाठी नासुप्रचे नाहरकत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक होते तसेच प्लॉटचे ३० वर्षांनंतर लीज नूतनीकरण करावे लागत होते. यामुळे मालमत्ताधारकांना नासुप्र कार्यालयात चकरा माराव्या लागत होत्या. यामुळे ही प्रक्रिया संपुष्टात आणण्याचा निर्णय विश्वस्त मंडळाच्या बैठकीत ३ सप्टेंबर २०१६ रोजी घेण्यात आला होता, परंतु नासुप्रने हा निर्णय फिरविला आहे. इस्टेट विभागाने लीजधारकांना नूतनीकरण शुल्क भरण्याबाबतच्या नोटिसा बजावल्या आहेत. नासुप्रचे प्लॉट विविध योजनांच्या माध्यमातून विकले जातात. प्लॉट खरेदी केल्यानंतर ही जागा ३० व ६० वर्षांच्या लीजवर दिली जाते. लीजधारकांना दरवर्षी ग्राऊं ड रेंट भरावा लागतो. लीज संपल्यानंतर नूतनीकरणासाठी प्लॉटधारकांना शुल्क द्यावे लागते. लीजचे नूतनीकरण होईल की नाही, अशी भीती प्लॉटधारकांच्या मनात असते. यामुळे नासुप्रच्या विश्वस्त मंडळाने लीज नूतनीकरणाची प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे शहरातील हजारो प्लॉटधारकांना मोठा दिलासा मिळाला होता. परंतु निर्णय फिरविल्याने लीजधारकांची पायपीट सुरूच राहणार आहे. या वर्षात ग्राऊं ड रेंटमध्ये तिपटीने वाढ क रण्यात आली आहे. गेल्या वर्षी तीन हजार भाडे देणाऱ्या प्लॉटधारकाला आता नऊ हजार भाडे द्यावे लागणार आहे; सोबतच सेवाशुल्कातही तिपटीने वाढ करण्यात आली आहे. यामुळे प्लॉटधारकांना दिलासा मिळण्याऐवजी आर्थिक बोजा वाढला आहे. यामुळे प्लॉटधारकांत नाराजी आहे. नासुप्रकडून खरेदी करण्यात आलेल्या भूखंडाचे व्यवहार करण्यासाठी लागणारे नासुप्रचे नाहरकत प्रमाणपत्र सादर करण्याची अट रद्द करण्यात आली होती. तसेच बांधकाम करताना रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा उभारणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या निर्णयाची अंमलबजावणी अद्याप करण्यात आलेली नाही. महापालिका क्षेत्रातील नासुप्रचे अधिकार संपुष्टात आणण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. त्यानुसार अधिकार संपुष्टात आणण्याची प्रक्रिया प्रशासन स्तरावर सुरू आहे. याबाबतच्या शासन निर्णयामुळे शहरातील भूखंडधारकांना मोठा दिलासा मिळाला होता. परंतु लीजधारकांना ग्राऊं ड रेंट भरण्याबाबतच्या नोटीस बजावण्याचे काम सुरू आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षाच्या तुलनेत ग्राऊं ड रेंट तिपटीने वाढविण्यात आले आहे. १ जून २०१७ पूर्वी ग्राऊंड रेंट न भरल्यास त्यावर १२ टक्के दराने व्याज आकारले जाणार आहे. निर्णयाची अंमलबजावणी व्हावी शहरातील प्लॉटधारकांना दिलासा मिळावा यासाठी ३ सप्टेंबर २०१६ रोजी विश्वस्त मंडळाच्या बैठकीत ३० वर्षानंतर प्लॉटच्या लीजचे नुतनीकरण व प्लॉटधारकांना व्यवहार करताना नासुप्रचे प्रमाणपत्र घेण्याची अट रद्द करण्यात आली होती. तसेच बांधकाम करताना रेनवॉटर हार्वेस्टींग यंत्रणा उभारणे बंधनकारक करण्यात आले होते. यासाठी सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. विश्वस्त मंडळाच्या निर्णयाची नासुप्रने अंमलबजावणी करावी. - बंडू राऊ त, माजी विश्वस्त निर्णयाबाबत अधिकारी अनभिज्ञ ३० वर्षानंतर प्लॉटचे लीज नुतनीकरण करण्याची प्रक्रिया संपुष्टात आणण्याच्या निर्णयाबाबत कल्पना नाही. कार्यकारी अधिकारीपदाची नुकतीच जबाबदारी स्वीकारली आहे. त्यामुळे या संदर्भात माहिती घेऊ न सांगता येईल. - सुशांत झाडे, क ार्यकारी अधिकारी नासुप्र