शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगांच्या वीजदरावर लवकरच निर्णय

By admin | Updated: February 29, 2016 03:02 IST

मुंबईत झालेल्या मेक इन इंडिया परिषदेत विदर्भ मराठवाड्यात दीड लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती : व्हीआयएच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटननागपूर : मुंबईत झालेल्या मेक इन इंडिया परिषदेत विदर्भ मराठवाड्यात दीड लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. येथील उद्योगांच्या विकासासाठी त्यांना देण्यात येणाऱ्या वीजदरावर लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे दिली. उद्योग भवनात विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या (व्हीआयए) कार्यालयात उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक विस्तारीत दालनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे होते. प्रमुख अतिथी म्हणून खासदार अजय संचेती, आ. डॉ. आशिष देशमुख, आ. समीर मेघे होते.विदर्भ मराठवाड्यातील उद्योजकांना द्यायच्या वीजदराबाबत नेमलेल्या समितीच्या अहवालावर लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्यात येणार आहे. प्रशासकीय कार्यपद्धती सरळसोपी करून विविध शासकीय परवाने आॅनलाईन मिळण्याबाबतची कार्यवाही सुरू झाली आहे. येत्या चार महिन्यात ही सेवा प्रभावीपणे काम करेल, असे त्यांनी सांगितले. यापुढे सर्व परवानग्या आॅनलाईन पुरविण्यात येईल. यासाठी मैत्री अंतर्गत एक खिडकी योजना प्रभावीपणे काम करेल. उद्योगातील अडचणी सोडविण्यासाठी उद्योग संघटना सकारात्मक सहकार्य करीत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.प्रारंभी व्हीआयचे उपाध्यक्ष अनिल पारख यांनी मुख्यमंत्र्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी माजी अध्यक्ष प्रवीण तापडिया यांनी विदर्भातील उद्योजकांना येणाऱ्या अडचणी सांगितल्या. संचालन व्हीआयएचे सचिव रोहित अग्रवाल यांनी केले. (प्रतिनिधी)