शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

गुणवाढ घोटाळ्यासंदर्भात आठवडाभरात निर्णय

By admin | Updated: August 1, 2016 02:12 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात चार वर्षांपूर्वी उघडकीस आलेल्या गुणवाढ घोटाळा प्रकरणावर अद्यापही अंतिम निर्णय झालेला नाही.

कुलगुरुंचे सूतोवाच : चौकशी पूर्ण, अहवाल सादर नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात चार वर्षांपूर्वी उघडकीस आलेल्या गुणवाढ घोटाळा प्रकरणावर अद्यापही अंतिम निर्णय झालेला नाही. यासंबंधातील चौकशी पूर्ण झाली असून याचा अहवाल कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांना सादर करण्यात आलेला आहे. या घोटाळ्यासंदर्भात ३ आॅगस्ट अगोदर निर्णय घेणार असल्याचे कुलगुरूंनी स्पष्ट केले आहे. तत्कालीन सहायक कुलसचिव संध्या चुनोडकर- हांडा या प्रकरणातील मुख्य आरोपी होत्या. जुलै २०१२ मध्ये फेरमूल्यांकनातून गुणवाढ, असा घोटाळा उजेडात आला होता. विद्यापीठाच्या फेरमूल्यांकन विभागातील सहायक कुलसचिव संध्या चुनोडकर-हांडा यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून त्यांच्या मुलाची तीन विषयात फेरमोजणी करून गुणवाढ करवून घेतली होती. हा प्रकार केवळ त्यांच्या मुलापुरता मर्यादित नव्हता तर इतरही अनेक विद्यार्थ्यांना याचा लाभ देण्यात आला, असा आरोप होता. विद्यापीठाने शिस्तपालन समितीद्वारे चौकशी करण्याचा निर्णय घेतला व तेव्हापासून हे प्रकरण समितीकडे होते.परीक्षा मंडळाच्या बैठकीत या अहवालाला मान्यतादेखील देण्यात आली होती व चुनोडकर-हांडा यांना निलंबित करण्यात आले होते. त्यांनी न्यायालयात दाद मागितली होती व सेवानिवृत्त न्यायाधीश धाराशिवकर यांच्यामार्फत विभागीय चौकशी करण्यात आली. या समितीने या प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल तयार केला. तो अहवाल संध्या चुनोडकर यांना पाठवून त्यांना त्याबाबत विचारणा करण्यात आली. त्यांची बाजू नोंदवून घेत, अंतिम अहवाल कुलगुरूंकडे पाठविण्यात आला आहे. यासंदर्भात कुलगुरूंना विचारणा केली असता त्यांनी ही बाब मान्य केली. या प्रकरणासंदर्भात निर्णय घेण्यासंदर्भात व्यवस्थापन परिषदेने मला अधिकार दिले आहेत. परीक्षा मंडळाच्या बैठकीअगोदर हा निर्णय घेण्यात येईल व तो सर्वांसमोर येईल, असे त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी) काणेंनीच सुरू केली होती चौकशी प्रभारी परीक्षा नियंत्रक असताना डॉ.काणे यांनी या प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात केली होती. विभागीय चौकशी समितीसमोर त्यांची साक्षदेखील झाली व उलटतपासणीदेखील करण्यात आली. आता डॉ.काणे हे स्वत: कुलगुरू झाले आहेत व जी चौकशी त्यांनी सुरू केली होती, त्यावर कुलगुरू म्हणून निर्णय तेच देणार आहेत. या योगायोगासंदर्भात विद्यापीठातच चर्चा रंगली आहे. अद्याप पोलीस तक्रार नाहीच गुणवाढ घोटाळा हे गंभीर प्रकरण होते. यासंदर्भात शिस्तपालन समितीने कठोर कारवाईची शिफारस केली होती. या प्रकरणात पोलीस तक्रार करावी, अशी मागणी संघटनांनी केली होती. परंतु अद्यापपर्यंत पोलीस तक्रार झालेली नाही.