शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

(निर्णयार्थ) २३ नोव्हेंबर रोजी राज्यभरात वीज बिलांची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 09:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्य शासनाने आश्वासन देऊनदेखील वीज बिलांची माफी दिलेली नाही. याविरोधात भारतीय जनता पक्षातर्फे आक्रमक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्य शासनाने आश्वासन देऊनदेखील वीज बिलांची माफी दिलेली नाही. याविरोधात भारतीय जनता पक्षातर्फे आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे. राज्य शासनाने तातडीने वीज बिल माफीसाठी पाच हजार कोटी रुपये द्यावेत. जर असे झाले नाही तर सोमवार २३ नोव्हेंबर रोजी राज्यभरात वीज बिलांची होळी करण्यात येईल, असा इशारा प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.

नागपूर पत्रकार क्लब येथे आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते. कोरोना ‘लॉकडाऊन’च्या कालावधीतील ३०० युनिटपर्यंत वीज बिल सवलतीची ऊर्जामंत्र्यांनी घोषणा केली. पण शासनाने शब्द फिरविला व वीज बिल माफ केले नाही. राज्यातील एक कोटी ग्राहकांचे घरगुती वीजबिल संपूर्णपणे माफ करावे ही आम्ही सातत्याने मागणी करत आहे. राज्यात ५९ हजार कोटींची थकबाकी असल्याने वीज बिल माफी नाही असे शासनाने सांगितले. मात्र शासनाने जर पाच हजार कोटी रुपये जरी दिले तरी संपूर्ण राज्यभरातील वीज बिलांचा प्रश्न सुटू शकतो. सरकारने तातडीने पुढील पाच वर्षांसाठी १०० युनिटपर्यंतच्या विजेचे बिल माफ करण्याची घोषणा करावी. तसेच ‘लॉकडाऊन’च्या कालावधीतील चार महिन्याचे बिलदेखील माफ करावे, अशी मागणी बावनकुळे यांनी केली.

आमचे सरकार आले तेव्हा २०१५ मध्ये विजेची १६,५२५ कोटींची थकबाकी होती. २०१९ मध्ये हा आकडा ४१, १३३ कोटींवर पोहोचला. मात्र आम्ही शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने वसुलीदेखील केली नाही व कुणाची वीजदेखील तोडली नाही. आमच्या काळात तीनही वीज कंपन्या नफ्यात होत्या. मात्र महाविकास आघाडी सरकारचा भोंगळ कारभार विजेच्या निमित्ताने जनतेसमोर आला आहे. हे ‘फ्यूज’ उडालेले सरकार आहे, अशी टीकादेखील त्यांनी केली.