शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक रेशन वितरणावरील निवेदनावर निर्णय घ्या; हायकोर्टाचा सरकारला आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 09:46 IST

राज्यातील प्रत्येक गरजू व्यक्तीला आवश्यक प्रमाणात, गुणवत्तापूर्ण व परवडणाऱ्या दरात रेशन उपलब्ध व्हावे आणि सार्वजनिक रेशन वितरण यंत्रणा प्रभावी व्हावी याकरिता रामटेकचे आमदार अ‍ॅड. आशिष जयस्वाल यांनी १९ एप्रिल २०२० रोजी सादर केलेल्या निवेदनावर एक महिन्यात निर्णय घ्यावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी राज्य सरकारला दिला.

ठळक मुद्दे निवेदनात ४० विविध मागण्यांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील प्रत्येक गरजू व्यक्तीला आवश्यक प्रमाणात, गुणवत्तापूर्ण व परवडणाऱ्या दरात रेशन उपलब्ध व्हावे आणि सार्वजनिक रेशन वितरण यंत्रणा प्रभावी व्हावी याकरिता रामटेकचे आमदार अ‍ॅड. आशिष जयस्वाल यांनी १९ एप्रिल २०२० रोजी सादर केलेल्या निवेदनावर एक महिन्यात निर्णय घ्यावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी राज्य सरकारला दिला.प्रकरणावर न्यायमूर्ती माधव जामदार यांच्यासमक्ष सुनावणी झाली. यासंदर्भात जयस्वाल यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. अन्य सुरक्षा कायद्याची काटेकोर अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हा तक्रार निवारण अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, राज्य अन्न आयोग, अंतर्गत तक्रार निवारण यंत्रणा व दक्षता समितीची स्थापना करण्यात यावी, पारदर्शकतेकरिता सार्वजनिक वितरण प्रणालीचा रेकॉर्ड नागरिकांना तपासण्यासाठी उपलब्ध करून देण्यात यावा, रेशनकार्डवर कार्ड क्रमांक, प्रवर्ग, रेशनचे प्रमाण, दर इत्यादी माहिती नमूद करण्यात यावी, रेशनकार्डधारकांचे नियमित पुनरावलोकन करण्यात यावे, नवीन रेशनकार्डसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात यावेत, अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या वेबसाईटवर रेशन दुकानांची जिल्हा, तालुका व परिसर निहाय यादी, त्यांचे दूरध्वनी क्रमांक, पत्ता व जीपीएस लोकेशनची माहिती अपलोड करण्यात यावी, सरकारी रेशनचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर करवाई करण्यात यावी यासह एकूण ४० मागण्यांचा जयस्वाल यांच्या निवेदनात समावेश आहे.लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार या नागरिकांना जगवण्यासाठी सार्वजनिक वितरण प्रणालीतून अन्नधान्य व अन्य जीवनावश्यक वस्तूंचा नियमानुसार पुरवठा करणे आवश्यक आहे. परंतु, राज्य सरकार या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात अपयशी ठरले आहे. त्यामुळे नागरिकांचा जगण्याचा घटनात्मक अधिकार हिरावला जात आहे. अनेक नागरिकांना रेशनकार्ड असूनही आवश्यक प्रमाणात, गुणवत्तापूर्ण आणि परवडणाऱ्या दरात रेशन उपलब्ध होत नाही. सार्वजनिक रेशनचा काळाबाजार केला जातोय, असा जयस्वाल यांचा आरोप आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. मोहित खजांची यांनी कामकाज पाहिले.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय