शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना निदानासाठी अ‍ॅन्टी बॉडी चाचणी करण्यावर निर्णय घ्या; हायकोर्टाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 22:26 IST

कोरोना निदानासाठी रुग्णांची रॅपिड अ‍ॅन्टी बॉडी बेस्ड ब्लड टेस्ट करण्याला मान्यता देण्यावर २० एप्रिलपर्यंत निर्णय घेण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आरोग्य व समाजकल्याण मंत्रालयाला दिला आहे.

ठळक मुद्देपीसीआर चाचणी वेळखाऊ व खर्चिक असल्याचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना निदानासाठी रुग्णांची रॅपिड अ‍ॅन्टी बॉडी बेस्ड ब्लड टेस्ट करण्याला मान्यता देण्यावर २० एप्रिलपर्यंत निर्णय घेण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आरोग्य व समाजकल्याण मंत्रालयाला दिला आहे.सध्या कोरोना निदानासाठी पीसीआर चाचणी केली जात आहे. नागपूरमध्ये केवळ तीन ठिकाणी ही याचणी करण्याची सुविधा आहे. तसेच, ही चाचणी वेळखाऊ व खर्चिक आहे. त्यामुळे सरकारने रॅपिड अ‍ॅन्टी बॉडी बेस्ड ब्लड टेस्टचा पर्याय उपयोगात आणण्याला परवानगी द्यायला हवी. या चाचणीला पीसीआर चाचणीपेक्षा कमी खर्च व वेळ लागतो. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या मार्गदर्शक तत्त्वात या चाचणीचा समावेश आहे, अशी माहिती डॉ. अनुप मरार यांचे वकील अ‍ॅड. तुषार मंडलेकर यांनी न्यायालयाला दिली. ही बाब लक्षात घेता न्यायालयाने वरील आदेश दिला.यासंदर्भात सी. एच. शर्मा व सुभाष झंवर यांच्या जनहित याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. त्यात डॉ. मरार यांनी मध्यस्थी अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणावर न्यायमूर्ती अतुल चांदुरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, डॉ. मरार यांनी रॅपिड अ‍ॅन्टी बॉडी बेस्ड ब्लड टेस्टसह कोरोना रुग्णांच्या होम आयसोलेशनचाही मुद्दा उपस्थित केला. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनुसार सर्वच कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयांमध्ये ठेवण्याची गरज नाही. त्यांना १५ दिवसांकरिता होम क्वॉरंटाईनमध्ये ठेवले जाऊ शकते. त्यामुळे रुग्णालयांवरील ताण कमी होईल असे त्यांनी सांगितले. उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला हा मुद्दादेखील विचारात घेण्याचे निर्देश दिले.न्यायालयाने यापूर्वी राज्य सरकारला विविध निर्देश दिले आहेत. त्या निर्देशांवर गांभीर्याने अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच, कोरोनाविरुद्ध लढण्याचा खर्च भागविण्यासाठी पब्लिक ट्रस्ट व वक्फ मंडळांकडून निधी उभा करण्यासंदर्भात काय निर्णय घेण्यात आला, याची माहिती पुढच्या तारखेला सादर करावी असे उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सांगितले. न्यायालय मित्र अ‍ॅड. अनुप गिल्डा व अ‍ॅड. राम हेडा यांनी याचिकांचे कामकाज पाहिले.५१ खासगी प्रयोगशाळांना कोरोना चाचणीची मान्यताइंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने ५१ खासगी प्रयोगशाळांना कोरोना चाचणीची मान्यता प्रदान केली आहे. तसेच, अन्य इच्छुक खासगी प्रयोगशाळांनाही मान्यता मिळविण्याचा मार्ग मोकळा आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च इन रिप्रॉडक्टिव्ह हेल्थच्या संचालकांनी उच्च न्यायालयाला ही माहिती दिली.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस