शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
3
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
4
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
5
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
6
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
7
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
8
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
9
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
10
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
11
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
12
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
13
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
14
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
15
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
16
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
17
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
18
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
19
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
20
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं

संकटातील शेतकऱ्यांना कर्ज माफी द्या

By admin | Updated: June 19, 2016 02:57 IST

राज्यातील शेतकरी हा संकटात सापडला असून, विविध समस्यांचा सामना करीत आहे. अशा स्थितीत त्याला आधाराची गरज आहे.

आम आदमी पार्टीचा धडक मोर्चा : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन नागपूर : राज्यातील शेतकरी हा संकटात सापडला असून, विविध समस्यांचा सामना करीत आहे. अशा स्थितीत त्याला आधाराची गरज आहे. त्यामुळे राज्य सरकारने सर्व शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून, प्रत्येकाला पुन्हा पीक कर्ज उपलब्ध द्या, अशा मागणीसह शनिवारी आम आदमी पार्टीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. दुपारी २.३० वाजताच्या सुमारास आम आदमी पार्टीच्या सिव्हिल लाईन्स येथील कार्यालयातून हा मोर्चा काढण्यात आला होता. परंतु पोलीस प्रशासनातर्फे या मोर्चाला जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाण्याची परवानगी दिली नाही. त्यामुळे तो मोर्चा सिव्हिल लाईन्स परिसरातील मीठा निम दर्गा येथेच समाप्त करण्यात आला. दरम्यान आम आदमी पार्टीचे नेते सुभाष वारे यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. या निवेदनातून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यासह नव्याने पीक कर्ज उपलब्ध करून द्या, बियाणे व खताचा काळाबाजार थांबवा, सातवा वेतन आयोग लागू करण्याअगोदर स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, अशा मागण्यांकडे शासनाचे लक्ष्य वेधण्यात आले. या मोर्चात संपूर्ण जिल्ह्यातून आलेल्या शेकडो शेतकऱ्यांनी भाग घेतला होता. तसेच आम आदमी पार्टीचे नेते सुभाष वारे, विदर्भ संघटक डॉ. देवेंद्र वानखडे, विदर्भ सचिव जगजीत सिंग, बन्सीधर कोठीकर, अशोक मिश्रा, ईश्वर गजबे, प्रमोद लढ्ढा, सचिन शेंडे, गोरले, चंद्रशेखर, गणेश रेवतकर, सुनील दीक्षित, फझिल रशीद, प्रभाकर आवारी, सचिन पारधी, किरण वेलोर, प्रभात अग्रवाल, सत्विंदर सिंग, संजय जीवतोडे, सोनू ठाकूर, कविता सिंघल, शालिनी अरोरा, शंकर इंगोले, पीयूष आकरे, रजनी शुक्ला, मन्सूर शेख, वसंत घाटीबांधे, प्रशांत इलमे, राकेश दवे, नीलेश गोयल, सुनंदा खैरकर, मनोज सोनी, वंदना मेश्राम, वीणा भोयर, संदीप सिंग, कलिम खान, अजय बन्सपाल, भूषण ढाकुलकर, एम. झेड. काझी, आरिफ दोसानी व मुन्ना तिवारी यांनी भाग घेतला होता. (प्रतिनिधी)