शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कर्जबाजारी शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:13 IST

भिवापूर : शेतात पेरले ते रोगराई, किडीचा प्रादुर्भाव आणि परतीच्या पावसाने गेले. अशाही आर्थिक कोंडीत दोन मुली व ...

भिवापूर : शेतात पेरले ते रोगराई, किडीचा प्रादुर्भाव आणि परतीच्या पावसाने गेले. अशाही आर्थिक कोंडीत दोन मुली व मुलाचे लग्न उरकले. कर्जाची परतफेड व कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची दारे बंद झाली. यातून आर्थिक व मानसिक कोंडी झालेल्या कर्जबाजारी शेतकऱ्याने शेतात गळफास घेत जीवनयात्रा संपविली. तालुक्यातील मानोरा येथे शुक्रवारी दुपारच्या सुमारास उजेडात आलेल्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

वामन शंकर रंगारी (५१, रा. मानोरा) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मानोरा‌ हे गाव उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याने प्रभावित आहे. त्यामुळे गावात व शेतात वन्यप्राण्यांचा कायम धुडगूस असतो. यात उभ्या पिकांचे नुकसान होत असल्याने अनेक शेतकरी रात्रीच्या सुमारास शेतात जागलीकरिता जातात. वामनसुद्धा गुरुवारी‌ रात्रीच्या सुमारास शेतात जागलीकरिता गेला होता. मात्र, सकाळी ११ वाजूनही तो घरी परतला नाही. त्यामुळे मृतकाची वयोवृद्ध आई जेवणाचा डब्बा घेऊन शेतात गेली.

दरम्यान, शेतातील बोरीच्या झाडाला वामनचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकलेला आढळला. माहिती मिळताच ग्रामस्थ व पोलीसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह स्थानिक ग्रामीण रुग्णालयात पाठविला. शवविच्छेदनानंतर ‌सायंकाळी मृतदेह कुटुंबीयांच्या सुपूर्द करण्यात आला. ठाणेदार महेश भोरटेकर यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र डहाके व गोकुळ सलामे करीत आहेत.

‌ दोन बँकांचे कर्ज

मृत वामनला दोन विवाहित मुली व एक मुलगा आहे. त्याच्याकडे सात एकर शेती आहे. एका राष्ट्रीयीकृत बँकेचे व सेवा सहकारी संस्थेचेसुद्धा कर्ज असल्याची माहिती मृतकाचा मुलगा शुभमने दिली. कर्जाची परतफेड आणि कुटुंबाचा गाडा अशी दुहेरी आर्थिक कोंडी त्याची झाली होती. यातूनच त्याने आत्महत्या केल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.