शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

आजवर २१ हजार कोटींची कर्जमाफी; मुख्यमंत्र्यांनी दिली आकडेवारी, विदर्भ व मराठवाड्याला अधिक लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 00:17 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत एकूण ६९ लाख खातेधारकांपैकी आजवर ४३ लाख १६ हजार ७६८ खातेधारकांची पडताळणी पूर्ण झाली आहे.

नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत एकूण ६९ लाख खातेधारकांपैकी आजवर ४३ लाख १६ हजार ७६८ खातेधारकांची पडताळणी पूर्ण झाली आहे. यापैकी २२ लाख ४६ हजार शेतक-यांच्या खात्यात २० हजार ७३४ कोटी रुपयांची कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत सादर केली.नियम २९३ अन्वये सत्ताधारी आमदारांनी उपस्थित केलेल्या चर्चेदरम्यान विरोधकांनी कर्जमाफीची नेमकी आकडेवारी वारंवार बदलण्यात आल्याचा आरोप करीत नेमकी किती शेतकºयांच्या खात्यात कर्जमाफीची किती रक्कम जमा झाली याची माहिती सादर करण्याचे आव्हान मुख्यमंत्र्यांना दिले होते. चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,आॅनलाईन प्रक्रियेच्या पूर्वी एका राष्ट्रीयीकृत बँकेने साडेसहा लाख लाभार्थ्यांची यादी सादर केली होती.आॅनलाईन माहिती मागविली असता असे लक्षात आले की, फक्त सव्वा लाखच पात्र खातेधारक आहेत. राज्यस्तरीय बँकर्स कमिटीच्या (एसएलबीसी) पहिल्या यादीत कृषी कर्ज खातेधारकांची संख्या ८९ लाख व थकबाकीची रक्कम ३४ हजार कोटी सांगण्यात आली. आॅनलाईन तपासणीत खातेधारक ६९ लाखच आढळले.आधार कार्ड लिंक केल्यामुळे ही माहिती समोर आली. फक्त ४५ दिवसांत एक कोटीहून अधिक शेतकºयांची आॅनलाईन बायोमेट्रिक खातरजमा करण्यात आली. यामुळे अपात्र खात्यांमध्ये जाणारे कोट्यवधी रुपये वाचविण्यात सरकारला यश आल्याचे त्यांनी सांगितले.केंद्र सरकारने २००६ मध्ये केलेल्या कर्जमाफीत एका आमदाराच्या घरातील आठ सदस्यांना लाखोंची कर्जमाफी मिळाली तर दुसरीकडे विदर्भातील अल्पभूधारकाच्या अटीमुळे विदर्भ व मराठवाड्यातील शेतकºयांना फायदा मिळाला नाही. त्यावेळी विदर्भाला फक्त १५०० कोटी व मराठवाड्याला १७०० कोटी मिळाले होते. आमच्या कर्जमाफीत विदर्भातील ११ लाख खातेधारकांना ५,७५४ कोटी, मराठवाड्यातील सहा लाख शेतकºयांना सहा हजार कोटी व उत्तर महाराष्ट्रातील सात लाख खातेधारकांना ३,७०४ कोटी रुपये मिळाले आहेत. काही जिल्ह्यांना तर एक हजार कोटीहून अधिक रुपये मिळाले असल्याचे सांगत या कर्जमाफीने संकटग्रस्त शेतकºयांना न्याय दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितले. या पुढील कर्जमाफी कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे़

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७