शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

क्षुल्लक कारणावरून वाद

By admin | Updated: October 25, 2014 02:39 IST

क्षुल्लक कारणावरून निर्माण झालेल्या वादाचे पर्यावसान प्राणघातक हल्ल्यात झाले. यात एका महिलेसह पाच जण जबर जखमी झाले.

नागपूर : क्षुल्लक कारणावरून निर्माण झालेल्या वादाचे पर्यावसान प्राणघातक हल्ल्यात झाले. यात एका महिलेसह पाच जण जबर जखमी झाले. आज दुपारी ४.३० च्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे राहुलनगर झोपडपट्टी, प्रियंकावाडी परिसरात रात्रीपर्यंत तणावाचे वातावरण होते. या भागात असलेल्या परप्रांतीय रहिवाशांकडून लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी गौरा-गौरीचा मोठा कार्यक्रम केला जातो. विसर्जनाची मोठी मिरवणूक काढण्यात येते. आज दुपारी परिसरातील मंडळी मोठ्या उत्साहाने या मिरवणुकीत सहभागी झाली. तलावावर विसर्जनाचा कार्यक्रम झाल्यानंतर दोन तरुणांमध्ये बाचाबाची झाली. उपस्थितांनी त्यावेळी दोघांनाही समज दिल्याने वाद टळला. त्यानंतर ही मंडळी राहुलनगर झोपडपट्टीत पोहचली. त्यांच्या मागोमाग १५ ते २० जण तलवार, रॉड आणि काठ्या घेऊन आले. त्यांनी सुनील लड्डूराम यादव याच्यावर जोरदार हल्ला चढवला. त्याच्या मदतीला धावलेल्या वेणूबाई देवगीरकर, उमेश वानखेडे, राजन सोनवणे आणि संजू मडावी यांनाही आरोपींनी जोरदार मारहाण केली. त्यामुळे ते जबर जखमी झाले. या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला.जखमींना तातडीने साई मंदिराजवळच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले. पोलिसांनाही कळविण्यात आले. त्यानुसार, धंतोलीचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींकडून घटनेची माहिती घेतली. दरम्यान, रात्री ७ च्या सुमारास जखमींचे समर्थक मोठ्या संख्येत धंतोली ठाण्यात पोहचले. त्यांनी आरोपींवर कडक कारवाई करून त्यांना तातडीने अटक करण्याची मागणी केली.पोलिसांनी आरोपी सोनू कनोजिया, विशाल शंभरकर, राकेश पाटील, पराग, नितीन तराळे, सारंग, इरफान, समशेर, जमशेद, मिलिंद, धर्मेंद्र, लड्डू पठाण आणि त्यांच्या साथीदारांवर गुन्हे दाखल केले. या घटनेमुळे रात्रीपर्यंत परिसरात तणावाचे वातावरण होते. (प्रतिनिधी)