शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

बूम लिफ्ट मशीनखाली दबून युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:07 IST

नागपूर : मेट्रो पीलरला पेंट करणाऱ्या बूम लिफ्ट मशीनखाली दबून एका युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री ...

नागपूर : मेट्रो पीलरला पेंट करणाऱ्या बूम लिफ्ट मशीनखाली दबून एका युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री संत्रा मार्केट येथील रेल्वे स्टेशनच्या गेटजवळ घडली. या घटनेने या परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.

प्राप्त माहितीनुसार, रात्री ८.१५ वाजता रेल्वे गेटसमोरील मेट्रो पीलर व छताला बूम लिफ्ट मशीनच्या मदतीने पेंट करण्यात येत होते. ३५ ते ४० वर्षीय मृतक युवक रस्त्याच्या कडेला झोपला होता. चालक मशीन रिव्हर्स घेत होता. या दरम्यात युवक मशीनखाली आला आणि त्याचा जागेवरच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच नागरिक गोळा झाले. त्यांनी नारेबाजी करीत मेट्रो आणि कंत्राटदाराला जबाबदार ठरवित कारवाईची मागणी केली. त्यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला. घटनेनंतर आरोपी चालक फरार झाला. घटनेची माहिती मिळताच गणेशपेठ ठाण्याचे पोलीस निरीक्षक भारत क्षीरसागर घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी शव मेडिकलला रवाना करून चौकशी प्रारंभ केली आहे.

मेट्रो रेल्वेने पीलर आणि छताच्या रंगरंगोटीचे काम आयटीडी कंपनीला दिले आहे. आयटीडी कंपनीने मॅन लिफ्ट नामक कंपनीला बूम लिफ्ट मशीन उपलब्ध करून देण्यास सांगितले. त्यानुसार, कंपनीने आयटीडीला तीन मशीन उपलब्ध करून दिल्या आहेत. आरोपी चालक मॅन लिफ्ट कंपनीचा आहे. सर्व मेट्रो लाइन मुख्य मार्गावर आहेत. या मार्गावर वाहने आणि नागरिकांची ये-जा जास्त असते. बूम लिफ्ट मशीनमुळे रस्ते अरुंद होतात. त्यामुळे अपघात होण्याची जास्त शक्यता असते. रात्री मोठ्या मशीने पेंट करताना रस्त्यावर सुरक्षारक्षक तैनात करणे आवश्यक आहे. रात्री पेटिंग करताना जीवहानी होऊ नये, म्हणून कोणतीही सुरक्षा बाळगण्यात आली नव्हती. गणेशपेठ पोलिसांनी बूम लिफ्ट मशीनचे चालक, कंत्राटदार कंपनी आणि मेट्रो अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करीत आहेत.