शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

स्वर्णजयंती एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये अडकून युवकाचा मृत्यू

By admin | Updated: March 19, 2017 03:02 IST

स्वर्णजयंती एक्स्प्रेसच्या इंजिनला विद्युत पुरवठा करणाऱ्या पेंटोमध्ये अडकून एका २४ वर्षाच्या युवकाचा

आत्महत्येची शक्यता : नरेंद्रनगर पुलावरून घेतली ‘ओएचई’ तारेवर उडी नागपूर : स्वर्णजयंती एक्स्प्रेसच्या इंजिनला विद्युत पुरवठा करणाऱ्या पेंटोमध्ये अडकून एका २४ वर्षाच्या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. यामुळे ही गाडी आपोआप जागेवर बंद पडून दुसरे इंजिन आल्यानंतर दोन तासांनी ही गाडी पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली. मृत युवकाने आत्महत्या केल्याची शक्यता लोहमार्ग पोलिसांनी वर्तविली आहे. रोशन मनोहर मेश्राम रा. बुध्दनगर. सोमलवाडा असे मृत युवकाचे नाव आहे. तो घाटे रोड येथील एका फायनान्स कंपनीत कामाला आहे. निजामुद्दीन-तिरुअनंतपुरम स्वर्णजयंती एक्स्प्रेस नागपूर रेल्वेस्थानकावर नियमितपणे रात्री ११.१५ वाजता येते. परंतु शुक्रवारी ही गाडी नागपुरात विलंबाने आली. नागपुरातून ही गाडी पुढील प्रवासासाठी रवाना झाल्यानंतर खापरी रेल्वेस्थानकानंतर या गाडीचे इंजिन अचानक बंद पडले. यामुळे या गाडीचा लोकोपायलटही गोंधळला. त्याने काय झाले याचा शोध घेतला परंतु त्यास काहीच समजले नाही. त्यानंतर इंजिनची देखभाल करणाऱ्या रेल्वेच्या तांत्रिक कर्मचाऱ्यांना इंजिनच्या दुसऱ्या बाजूने रक्त खाली पडताना दिसले. त्यांनी लगेच या घटनेची माहिती लोहमार्ग पोलिसांना दिली. नियंत्रण कक्षाने लोहमार्ग पोलिसांना सूचना दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर ‘ओएचई’ (ओव्हर हेड इक्विपमेंट) तारेचा विद्युत पुरवठा खंडित करून ट्रॅक्शन विभागाच्या साहाय्याने या गाडीचा पेंटो खाली घेऊन हे इंजिन कोचपासून वेगळे करण्यात आले. हे इंजिन लूपलाईनवर उभे करण्यात आले. त्यानंतर या गाडीला दुसरे इंजिन लावून ती पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली. संबंधित युवकाने आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.(प्रतिनिधी) मृताची दुचाकी आढळली नरेंद्रनगर पुलावर मृत युवकाची अ‍ॅक्टीव्हा गाडी पोलिसांना नरेंद्रनगर पुलाजवळ आढळली आहे. त्यामुळे त्याने नरेंद्रनगर पुलावरून रेल्वेगाडीखाली उडी घेण्याच्या हेतूने उडी मारली. मात्र त्याचा अंदाज चुकला आणि तो २५ हजार केव्ही उच्चदाबाच्या ‘ओएचई’ तारेवर अडकून गंभीर भाजला. त्यानंतर तो स्वर्णजयंती एक्स्प्रेसच्या पेंटोमध्ये अडकला आणि गाडी बंद पडली.