शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

स्वाईन फ्लू मृत्यूचा आकडा शंभरावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 00:16 IST

एकीकडे सण-उत्सवाचे वातावरण असताना दुसरीकडे मात्र स्वाईन फ्लूने गंभीर रूप धारण केले आहे.

ठळक मुद्देआणखी तिघांचे मृत्यू : रुग्णांची संख्या ५५० वर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकीकडे सण-उत्सवाचे वातावरण असताना दुसरीकडे मात्र स्वाईन फ्लूने गंभीर रूप धारण केले आहे. सोमवारी आणखी तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून, नागपूर विभागात मृताचा आकडा १०४ वर पोहोचला आहे तर रुग्णांची संख्या ५५० झाली आहे.सुरेखा बोपनवार (४२) रा. संत गाडगेबाबानगर चंद्रपूर, सरिता गंधारे (४३) रा. सत्यम्नगर पारडी व भूपेंद्र पांडे (६१) रा. छिंदवाडा अशी मृतांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या तिन्ही मृतांवर नागपुरातील रुग्णालयात उपचार सुरू होते. यांचा मृत्यू गुरुवारी झाला असला तरी त्याची नोंद उपसंचालक आरोग्य विभागाने सोमवारी घेतली. स्वाईन फ्लू मृताचा आकडा १०४ वर पोहोचल्याने सर्वाधिक मृतांच्या आकडेवारीत नागपूर विभाग तिसºया क्रमांकावर आले आहे.शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपचारआरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांनी सांगितले, स्वाईन फ्लूवरील आवश्यक औषधे सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, स्वाईन फ्लूच्या रुग्णांवर मोफत उपचार व्हावेत म्हणून आवश्यक निधीही उपलब्ध करून दिला आहे.सर्दी, खोकला, तापाकडे दुर्लक्ष नकोसर्दी, खोकला व ताप असेल तर तो अंगावर काढू नका किंवा स्वत:हून औषधे घेऊ नका. डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वाईन फ्लूच्या तत्काळ निदानाने औषधोपचाराचा चांगला प्रभाव पडतो. सण-उत्सवाचे दिवस असले तरी गर्दीच्या ठिकाणांपासून लहान मुलांना दूर ठेवायला हवे. सोबतच वारंवार हात धुणे, शिंकणाºया व खोकलणाºया व्यक्तीपासून दूर राहायला हवे. पुरेशी झोप घेणे व स्वाईन फ्लू प्रतिबंधात्मक लस घेणे आवश्यक आहे.-डॉ. अविनाश गावंडेसहयोगी प्राध्यापक, मेडिकल