शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
2
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
3
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर सुविधा, कडेकोड सुरक्षा; प्रशासन सज्ज
4
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
5
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
6
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
7
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
8
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
9
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
10
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
11
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
12
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
13
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
14
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
15
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
16
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
17
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
18
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
19
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
20
'कुणबी प्रमाणपत्र,व्हॅलिडिटीचा प्रश्न सोडवा'; धाराशिवमध्ये सरनाईकांना मराठा तरुणांचा घेराव!

निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:08 IST

गायत्रीदेवी पांडे यांचे निधन झाले. माजी खासदार आणि काँग्रेसचे नेते अविनाश पांडे यांच्या त्या मातोश्री होत. राजे उदयसिंह भोसले ...

गायत्रीदेवी पांडे यांचे निधन झाले. माजी खासदार आणि काँग्रेसचे नेते अविनाश पांडे यांच्या त्या मातोश्री होत.

राजे उदयसिंह भोसले ()

श्रीमंत राजे उदयसिंह प्रतापसिंह भोसले (७४, रा. ज्युनियर भोसला पॅलेस महाल) यांचे कोरोनामुळे निधन झाले. ते मराठा विद्या प्रसारक समाजाचे ज्येष्ठ आजीवन सभासद होते. काशीबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

तुळशीराम गाणार ()

तुळशीराम आत्माराम गाणार (८०, रा. शिवराजनगर १, मेडिकल कॉलेजच्या मागे) यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुली, एक मुलगा आहे. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

राजेश वानखेडे ()

राजेश मनोहर वानखेडे (५५, रा. दत्तमंदिराजवळ मिरे ले-आऊट) यांचे हृदयविकारामुळे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी आहे. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

कृष्णकुमार रघुवंशी ()

कृष्णकुमार रघुवंशी (८२, रा. व्यंकटेश अपार्टमेंट, पर्यावरणनगर) यांचे कोरोनामुळे निधन झाले. ते एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटीतून सहायक महाव्यवस्थापक पदावरून निवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आहे.

मनोज रामटेके (एच डेली मनोज रामटेके)

मनोज कोटीराम रामटेके (४२, रा. पंचशीलनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

निर्मलादेवी खेमका ()

निर्मलादेवी खेमका (७० रा. युगलकुंज, माऊंट रोड सदर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुली, मुलगा आहे.

प्रकाश डबरे ()

प्रकाश देवराव डबरे (५६, रा. टिमकी) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

संजय झिलपे ()

संजय झिलपे (६३, रा. रामदासपेठ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी आहे.

अनिल चौधरी

अनिल वसंत चौधरी (४४ रा. पार्वतीनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आहे. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुशीलकुमार अँथोनी

सुशीलकुमार अँथोनी (७२, रा. मेकोसाबाग ख्रिश्चन कॉलनी, कडबी चौक) यांचे निधन झाले. जरीपटका कब्रस्तान येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

करमचंद कुंगवानी

करमचंद कुंगवानी (८५, रा. प्लॉट नं. ११५, पॉवरग्रीड चौक) यांचे निधन झाले. नारा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

लीलाबाई ढोक

लीलाबाई आनंद ढोक (७८) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

हरीश हाडगे ()

हरीश चिंधूजी हाडगे यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आहे. दिघोरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मिठाबाई कोटांगले ()

मिठाबाई भीमराव कोटांगले (६८, रा. मिसाळ ले-आऊट जरीपटका) यांचे निधन झाले. नारी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

चंद्रिका शर्मा ()

चंद्रिका मोहन शर्मा (५७, रा. प्लॉट नं. ४, जय भवानीनगर, पारडी) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

विष्णुपंत उमाठे ()

विष्णुपंत उमाठे (६५, रा. शांतिनगर) यांचे निधन झाले. शांतिनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.