शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सहाही आरोपींची फाशी रद्द : यवतमाळ जिल्ह्यातील सपना पळसकर नरबळी प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 19:34 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने यवतमाळ जिल्ह्यातील सपना पळसकर नरबळी प्रकरणामध्ये सरकार पक्षाला संशयाशिवाय गुन्हा सिद्ध करण्यात अपयश आल्यामुळे सहाही आरोपींची फाशीसह अन्य शिक्षा रद्द करून त्यांना निर्दोष सोडले. न्यायमूर्तीद्वय प्रदीप देशमुख व मुरलीधर गिरटकर यांनी शुक्रवारी हा निर्णय जाहीर केला.

ठळक मुद्देहायकोर्टाचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने यवतमाळ जिल्ह्यातील सपना पळसकर नरबळी प्रकरणामध्ये सरकार पक्षाला संशयाशिवाय गुन्हा सिद्ध करण्यात अपयश आल्यामुळे सहाही आरोपींची फाशीसह अन्य शिक्षा रद्द करून त्यांना निर्दोष सोडले. न्यायमूर्तीद्वय प्रदीप देशमुख व मुरलीधर गिरटकर यांनी शुक्रवारी हा निर्णय जाहीर केला.यशोदा पांडुरंग मेश्राम, मनोज ऊर्फ लाल्या वसंत आत्राम, देवीदास पुनाजी आत्राम, यादव तुकाराम टेकाम, पुनाजी महादेव आत्राम व मोतीराम महादेव मेश्राम अशी आरोपींची नावे असून ते चोरंबा, ता. घाटंजी येथील रहिवासी आहेत. १४ आॅगस्ट २०१७ रोजी सत्र न्यायालयाने या आरोपींना फाशीसह अन्य शिक्षा सुनावली होती. राज्य सरकारने फाशीची शिक्षा कायम करण्यासाठी उच्च न्यायालयासमक्ष प्रकरण सादर केले होते. तसेच, आरोपींनी त्यांच्या शिक्षेविरुद्ध अपील दाखल केले होते. त्यावर एकत्रितपणे नोव्हेंबरमध्ये अंतिम सुनावणी पूर्ण झाली. त्यानंतर राखून ठेवलेला निर्णय उच्च न्यायालयाने शुक्रवारी जाहीर केला. सरकार पक्षाला ठोस पुरावे सादर करण्यात अपयश आल्यामुळे आरोपींना संशयाचा लाभ देण्यात आला. आरोपींतर्फे अ‍ॅड. राजेंद्र डागा तर, सरकारतर्फे अ‍ॅड. ए. एम. देशपांडे यांनी बाजू मांडली.असे आहे प्रकरणअंगात देवी देणाऱ्या दुर्गा सिरभातेने आरोपींना कुळाचे व गावाचे भले होण्यासाठी मुलीच्या रक्ताची मागणी केली होती. त्यामुळे आरोपींनी कट रचून नात्यातीलच सात वर्षीय बालिका सपनाचा बळी दिला असे सरकार पक्षाचे म्हणणे होते. सपना २४ आॅक्टोबर २०१२ रोजी बेपत्ता झाली होती. त्यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली होती. त्यानंतर २० मे २०१३ रोजी गावाजवळच्या जंगलात मुलीची कवटी, कपडे, हाडे व केस आढळून आले. ते अवशेष सपनाचे असल्याचे तिच्या पालकांनी ओळखले. तसेच, डीएनए चाचणीतही ते सिद्ध झाले.सिरभातेलाही संशयाचा लाभसत्र न्यायालयाने दुर्गा सिरभातेला पाच वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली होती. त्याविरुद्ध तिने उच्च न्यायालयात अपील दाखल केले नव्हते. परंतु, उच्च न्यायालयाने कायदेशीर बाबी लक्षात घेता अन्य आरोपींसह सिरभातेलाही संशयाचा लाभ देऊन निर्दोष सोडले. आठवा आरोपी रामचंद्र गणपत आत्राम याचा सत्र न्यायालयात खटला प्रलंबित असतानाच मृत्यू झाला होता. त्यामुळे त्याचे नाव खटल्यातून वगळण्यात आले होते.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयMurderखून