शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

निपाह मेंदूज्वरामुळे मृत्यूचे प्रमाण ७५ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 21:50 IST

रेबीजनंतर सर्वात घातक असलेल्या निपाह मेंदूज्वराचे मृत्यूचे प्रमाण ५० ते ७५ टक्के एवढे आहे. यावर्षी केरळमधील कोझीकोड जिल्ह्यात झालेल्या निपाह मेंदूज्वराच्या उद्रेकामध्ये १९ रुग्णांपैकी १७ रुग्ण मृत्यूमुखी पडले. कोझीकोडचे मेंदू रोगतज्ज्ञ डॉ. जया क्रिश्नन यांनी सांगितले, १७ मे रोजी २७ वर्षाच्या रुग्णामध्ये या रोगाचे निदान झाले. दुसऱ्याच दिवशी त्याचे वडील आणि आत्याही याच रोगाच्या प्रादुर्भावाने दवाखान्यात दाखल झाले. यावरून या रोगाची भीषणता दिसून येते.

ठळक मुद्देराष्ट्रीय ‘ब्रेन वीक’ : केरळमध्ये १७ रुग्णांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेबीजनंतर सर्वात घातक असलेल्या निपाह मेंदूज्वराचे मृत्यूचे प्रमाण ५० ते ७५ टक्के एवढे आहे. यावर्षी केरळमधील कोझीकोड जिल्ह्यात झालेल्या निपाह मेंदूज्वराच्या उद्रेकामध्ये १९ रुग्णांपैकी १७ रुग्ण मृत्यूमुखी पडले. कोझीकोडचे मेंदू रोगतज्ज्ञ डॉ. जया क्रिश्नन यांनी सांगितले, १७ मे रोजी २७ वर्षाच्या रुग्णामध्ये या रोगाचे निदान झाले. दुसऱ्याच दिवशी त्याचे वडील आणि आत्याही याच रोगाच्या प्रादुर्भावाने दवाखान्यात दाखल झाले. यावरून या रोगाची भीषणता दिसून येते. 

निपाह मेंदूज्वराचे पहिल्यांदा रुग्ण १९९८ मध्ये क्वालालम्पूरजवळील निपाह या गावी दिसून आले. लवकरच तो इतर गावात आणि सिंगापूरलादेखील पसरला. येथे आणि डुकरांना हा रोग झाला आणि नंतर तो डुकराची पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना झाला. त्यावेळी २६५ रुग्णांची नोंद झाली. त्यातल १०४ रुग्ण दगावले. २००१ मध्ये सिलिगुडी येथे ६६ रुग्णांची नोंद झाली होती.फळ खाणाऱ्या वटवाघुळांमध्ये हे विषाणू घर करून राहतात आणि नंतर जनावराच्या किंवा मनुष्याच्या शरीरात जातात आणि रोग पसरतो. वटवाघुळाला मात्र हा रोग होत नाही. मात्र त्याची लाळ आणि विष्टेमुळे फळ बाधित होतात आणि ही फळं माणसाने किंवा जनावरांनी खाल्ली तर त्यांना निपाहची लागण होते. हा रोग अतिशय लागट आहे. यामुळे विषाणुबाधित ताडी प्याल्यामुळेसुद्धा माणसामध्ये संसर्ग होतो. हा विषाणू माणसापासूनसुद्धा पसरतो. सिलिगुडी आणि बांगला देशमध्ये ६५ टक्के रुग्ण हे दवाखान्यातील कर्मचारी किंवा सुरुवातीच्या रुग्णाचे नातेवाईक होते. सात दिवसांत मृत्यूमुखी पडतात रुग्ण 
या भयंकर रोगाकरिता औषध नाही आणि प्रतिबंधक लसदेखील नाही. रोग कमी प्रमाणात दिसतो. परंतु घातक आहे. कारण, लक्षणे दिसताच सात दिवसांत या रोगाने रुग्ण दगावतो. औषधी नसल्यामुळे या रोगापासून बचाव करण्याची गरज आहे, असे जागतिक टॉपिकल न्यूरोलॉजीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी सांगितले.

 

टॅग्स :Nipah Virusनिपाह विषाणूdoctorडॉक्टर