शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

चिमुकल्याचा पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2019 22:28 IST

खेळता खेळता पाण्याच्या टाकीत तोल जाऊन पडलेल्या ३ वर्षीय चिमुकल्याचा बुडून मृत्यू झाला.

जलालखेडा : खेळता खेळता पाण्याच्या टाकीत तोल जाऊन पडलेल्या ३ वर्षीय चिमुकल्याचा बुडून मृत्यू झाला. अर्णव (अंशू) कैलास घोरपडे (रा. खरबडी) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. नरखेड तालुक्यातील खरबडी येथे शनिवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. कैलास घोरपडे हे मुलगा आणि मुलीसह घरी टीव्ही पाहत होते. याचवेळी अर्णव बाहेर खेळायला गेला. यानंतर काही मिनिटांनी कैलास घोरपडे त्याला पाहायला घराबाहेर आले. अर्णव त्यांना अंगणात दिसला नाही. त्यांनी इतरत्र शोधाशोध केली. परंतु तो दिसला नाही. यानंतर कैलास यांनी पाण्याच्या टाकीकडे जाऊन बघितले असता अर्णव टाकीत पडलेला दिसला. त्यांनी लगेच त्याला टाकीतून बाहेर काढले व जलालखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचारासाठी आणले. वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत वैखंडे यांनी तपासणी दरम्यान त्याला मृत घोषित केले.