काटाेल : माेकळ्या भूखंडावर चारा खात असलेल्या म्हशीचा विजेच्या तुटलेल्या जिवंत तारेला स्पर्श झाला आणि त्यातच त्या म्हशीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना काटाेल पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील डाेंगरगाव येथील एमआयडीसी परिसरात शनिवारी (दि. १०) सायंकाळी घडली.
हरिभाऊ नारायण काळमेघ, रा. काटाेल यांची डाेंगरगाव परिसरात शेती आहे. शनिवारी सायंकाळी ते म्हैस घेऊन घराकडे परत येत हाेते. ती म्हैस चारा खात जात असतानाच तिचा तुटलेल्या विजेच्या जिवंत तारेला स्पर्श झाला आणि तिचा विजेच्या धक्क्याने घटनास्थळीच मृत्यू झाला. ती म्हैस दुधाळ असून, आपले किमान ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती हरिभाऊ काळमेघ यांनी दिली असून, महावितरण कंपनीने या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून याेग्य नुकसान भरपाई देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
100721\img-20210710-wa0303.jpg
स्ट्रीट लाईटच्या मोकळ्या तारांचा करंट लागून दुधाळ म्हशींचा मृत्य