शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
4
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
5
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
6
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
7
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
8
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
9
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
10
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
11
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
12
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
13
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
14
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
15
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
16
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
17
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
18
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
19
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
20
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
Daily Top 2Weekly Top 5

अधिष्ठात्यांचे आदेश : ‘मोबाईल-रे’ची गंभीर दखल

By admin | Updated: September 9, 2015 03:16 IST

मेडिकलच्या क्ष-किरण विभागात फिल्मचा तुटवडा पडल्याने येथील डॉक्टर व तंत्रज्ञ मिळून ‘मोबाईल-रे’चे अजबच तंत्र शोधून काढले होते.

मेडिकलचे एक्स-रे झाले आॅनलाईन नागपूर : मेडिकलच्या क्ष-किरण विभागात फिल्मचा तुटवडा पडल्याने येथील डॉक्टर व तंत्रज्ञ मिळून ‘मोबाईल-रे’चे अजबच तंत्र शोधून काढले होते. रुग्णांच्या जीवाशी चाललेला हा खेळ मंगळवारी ‘लोकमत’ने उघडकीस आणताच खळबळ उडाली. अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी एक्स-रे चा मोबाईलवरून फोटो काढण्याचा प्रकार तत्काळ थांबविण्याचे निर्देश दिले, व स्वत: लक्ष घालत संगणकावरील एक्स-रे डॉक्टरांना आॅनलाईन पाहता येईल, अशी हेल्थ इन्फार्मेशन मॅनेजमेंट सिस्टीमही (एचआयएमएस) ची प्रणाली लागू केली, तसे लेखी आदेशही संबंधित विभागाला दिले.मेडिकलला एक्स-रे फिल्म पुरवठा करणाऱ्या कंपनीचे सुमारे ३० लाखांचे बिल थकले आहे. यामुळे संबंधित कंपनीने फिल्म पुरवठा करण्यास नकार दिला आहे. परिणामी, एक्स-रे, एमआरआय आणि सिटी स्कॅनसाठी दिवसभरात लागणाऱ्या ५०० वर फिल्मच्याऐवजी मेडिकल प्रशासनाला स्थानिक पातळीवर सुमारे २०० फिल्म विकत घ्याव्या लागत आहे. यामुळे गंभीर रुग्णांचेच या मशीनवर निदान करून एक्स-रे ची फिल्म दिली जात आहे. हा प्रकार २०१४ च्या हिवाळी अधिवेशनात व नुकत्याच झालेल्या २०१५च्या पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यानही घडला. विधान परिषदेत आमदार प्रकाश गजभिये यांनी यावर प्रश्नही उपस्थित केला होता. त्यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी ही समस्या मार्गी लावण्याची ग्वाही दिली होती. परंतु आजही रुग्णांचे हाल सुरू आहेत. नुकतेच मेडिकलच्या काही डॉक्टरांनी आणि क्ष-किरण केंद्राच्या डॉक्टरांनी मिळून अजबच तंत्र विकसित केले. रुग्णांच्या मोबाईलमध्ये संगणकावरील थेट ‘एक्स-रे’चा फोटो काढणे सुरू केले. ज्यांच्याकडे मोबाईल नाही त्यांना एक्स-रे नाही, तर ज्यांनी मोबाईलमध्ये एक्स-रे चा फोटो काढला त्यावरच आजाराचे निदान करण्याचा धक्कादायक प्रकार सुरू केला. ‘लोकमत’ने मंगळवारी याचे सविस्तर वृत्त ‘एक्स-रे नव्हे मोबाईल-रे’ या मथळ्याखाली प्रसिद्ध केले. याची दखल अधिष्ठाता डॉ. निसवाडे यांनी घेऊन फिल्म तुटवड्यावर व ‘मोबाईल-रे’वर तोडगा म्हणून आॅनलाईन प्रणाली मंगळवारपासूनच लागू केली. (प्रतिनिधी)डॉक्टरांच्या संगणकावर दिसेल ‘आॅनलाईन एक्स-रे’क्ष-किरण विभागात डिजिटल रेडिओलॉजी मशीन उपलब्ध आहे. ही मशीन ‘एचआयएमएस’च्या प्रणालीशी जोडून सर्व डॉक्टरांना रुग्णांचा एक्स-रे संगणकावर पाहण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. यात डॉक्टरांना संगणकावर केवळ रुग्णाचे नाव टाकायचे आहे. या प्रणालीमुळे महागडी फिल्म, रुग्णाचा मोबाईल वापरण्याची गरज नाही. विशेष म्हणजे, रुग्णाचा वेळ वाचून योग्य निदान होईल. ही सोय सिटी स्कॅन व एमआरआयसाठीही वापरली जाणार आहे.