शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बहिरेपणा नाही श्राप, नका देऊ त्यांना त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:08 IST

नागपूर : श्रवणशक्ती व कानांचे आजार लवकर ओळखणे ही प्रभावी व्यवस्थापनाची गुरुकिल्ली आहे. वैद्यकीय उपचारांमुळे अर्धे नुकसान टाळता येते. ...

नागपूर : श्रवणशक्ती व कानांचे आजार लवकर ओळखणे ही प्रभावी व्यवस्थापनाची गुरुकिल्ली आहे. वैद्यकीय उपचारांमुळे अर्धे नुकसान टाळता येते. लसीकरण, गर्भधारणेदरम्यान योग्य काळजी, मोठा आवाज टाळल्यास बहिरेपणाला काही प्रमाणात दूर ठेवणे शक्य असल्याची जनजागृती रविवारी विदर्भ ‘एओआय’च्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या पदयात्रेतून करण्यात आली. यावेळी ‘बहिरेपणा नाही श्राप, नका देऊ त्यांना त्रास’ हे घोषवाक्य लक्ष वेधणारे ठरले.

आंतरराष्ट्रीय बहिरेपणा जागरूकता आठवड्यानिमित्ताने विदर्भ कान, नाक व घसा तज्ज्ञ आणि वाचा थेरपिस्ट संघटनेच्यावतीने (एओआय) लोकमत भवन चौक ते व्हेरायटी चौक दरम्यान पदयात्रा काढण्यात आली. यात विदर्भातून जवळपास ७५ ईएनटी विशेषज्ञांसह ईएनटी पदव्युत्तरचे विद्यार्थी, ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच लँग्वेज थेरपिस्ट तज्ज्ञ सहभागी झाले होते. केंद्रीय ‘एओआय’चे सदस्य डॉ. नंदू कोलवाडकर व डॉ. समीर चौधरी यांनी यासाठी पुढाकार घेतला. या पदयात्रेचे नियोजन व अंमलबजावणी विदर्भ ‘एओआय’चे अध्यक्ष डॉ. प्रशांत निखाडे व सचिव डॉ. समीर ठाकरे यांनी केले. यावेळी शहरातील पाचही वैद्यकीय महाविद्यालये सहभागी झाली होती. विशेषत: मेडिकलचे ईएनटी विभागाचे प्रमुख डॉ. देवेंद्र माहोरे, मेयोच्या ईएनटी विभागाचे प्रमुख डॉ. जीवन वेदी, डॉ. विवेक हरकरे, डॉ. बी. श्रीकृष्ण, डॉ. सुरेंद्र गवारले, डॉ. बी. के. शर्मा व डॉ. राजेंद्र देशमुख आदींचा समावेश होता. या पदयात्रेत सहभागी विद्यार्थी व तज्ज्ञांनी ईएनटीबाबत आजारांचे व उपचारांचे फलक हाती घेत जनजागृती केली.

- बहिरेपणाचा जीवनाच्या अनेक पैलूंवर परिणाम - डॉ. निखाडे

डॉ. प्रशांत निखाडे म्हणाले, बहिरेपणामुळे संवाद, भाषण, आकलन, शिक्षण आणि रोजगार यासारख्या जीवनातील अनेक पैलूंवर परिणाम होतो. श्रवण कमी झालेल्या मुलांना अनेकदा शालेय शिक्षण मिळत नाही. श्रवणशक्ती कमी असलेल्या प्रौढांमध्येही बेरोजगारीचे प्रमाण खूप जास्त असते. ज्यांची श्रवणशक्ती कमी आहे, अशा लोकांमध्ये सामान्यांच्या तुलनेत कमी ग्रेडच्या नोकऱ्या मिळतात. म्हणूनच श्रवणशक्ती व संबंधित रोगाचे वेळीच निदान व उपचार होणे आवश्यक असून, त्याविषयी जनजागृती करणे गरजेचे आहे.