शहरं
Join us  
Trending Stories
1
७/११तील सर्व दोषी निर्दोष; असदुद्दीन ओवेसी म्हणतात, “गेली १७ वर्षे निष्पाप लोक जेलमध्ये...”
2
महाराष्ट्रानंतर आता बंगालमध्ये 'भाषा' पॉलिटिक्स? ममता बॅनर्जी यांनी उघड-उघड खेळलं 'बांगला कार्ड'!
3
“कृषीमंत्री रमीत रमतो, हनीट्रॅपचा फास सत्ताधाऱ्यांच्या गळ्यात, उच्चस्तरीय चौकशी करा”: सपकाळ
4
तुमच्या नावे कोणी बनावट लोन तर घेतलं नाहीये ना? घरबसल्या पॅन कार्डावरुन कसं तपासाल, दिसलं तर काय कराल?
5
२३ विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, व्हिडीओही बनवले; वासनांध शिक्षकाचे हादरवून टाकणारे कृत्य
6
'चायनीज' माल निघाला दगाबाज! बांगलादेशात कॉलेजवर कोसळलेले 'ते' लढाऊ विमान चिनी बनावटीचे
7
सचिन पिळगावकरांनी घेतलेली मधुबालाची भेट, म्हणाले, "ती बाई जितकी सुंदर होती त्यापेक्षा १० पटीने..."
8
वेळीच व्हा सावध! सोमवारीच का असतो हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका? 'या' गोष्टी कारणीभूत
9
"आम्हाला तोंड उघडायला लावू नका..."; सुप्रीम कोर्ट ईडीवर संतापले; काय आहे प्रकरण?
10
MBA ग्रॅज्युएट चोर; २० वर्षांत चोरल्या १०० हून अधिक आलिशान गाड्या, असा लागला पोलिसांच्या हाती
11
भारत-पाक मॅच रद्द; आफ्रिदीसोबत गप्पा मारताना दिसल्यामुळे अजय देवगण ट्रोल, जाणून घ्या त्यामागचं सत्य
12
अंबानींच्या आवडत्या कंपनीचा शेअर आपटला; पण, 'या' स्टॉक्समुळे सेन्सेक्स-निफ्टीची दमदार वाढ
13
शेअर असावा तर असा! सलग २४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट; किंमत ₹५० पेक्षा कमी, गुंतवणूकदार मालामाल
14
झोपेत असताना तो तिच्यावर लैंगिक अत्याचार करायचा, नंतर लाथा मारायचा; माजी महिला खासदाराने केले गंभीर आरोप
15
Kamika Ekadashi 2025:आपण जन्म मरणाच्या फेऱ्यात का अडकतो? 'हे' सांगणारे चित्र!
16
हवाई दलाचे विमान महाविद्यालयावर कोसळले; अनेकांच्या मृत्यूचा संशय, बांग्लादेशातील घटना
17
Solapur Crime: घरकुलाचा वाद आणि १० वर्षाच्या कार्तिकची हत्या; आरोपी निघाला जवळचा नातेवाईक, सीसीटीव्हीमुळे गूढ उलगडले
18
"विश्वासघात वेदनादायक होता पण..." नवऱ्याच्या व्हायरल व्हिडीओवर अँडी बायरनच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया?
19
७ कोटी मुलांसाठी गुड न्यूज; आता शाळेतच होणार आधारशी निगडीत 'हे' काम, UIDAI ची विशेष सुविधा
20
गोरी दिसण्यासाठी काय नाही केलं, शेवटी देवाकडे नवस केला अन् मग...; 'झांसी की रानी' फेम अभिनेत्रीचा स्ट्रगल

मद्य व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला

By admin | Updated: February 13, 2015 02:13 IST

सीताबर्डीतील मद्य व्यावसायिक राजीव ऊर्फ राजू जयस्वाल यांच्यावर आज दुपारी एमआयडीसीतील मद्य व्यावसायिक पप्पू जयस्वालने आपल्या साथीदाराच्या मदतीने प्राणघातक हल्ला चढवला.

नागपूर : सीताबर्डीतील मद्य व्यावसायिक राजीव ऊर्फ राजू जयस्वाल यांच्यावर आज दुपारी एमआयडीसीतील मद्य व्यावसायिक पप्पू जयस्वालने आपल्या साथीदाराच्या मदतीने प्राणघातक हल्ला चढवला. या हल्लयात राजू जयस्वाल गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. या घटनेमुळे उपराजधानीतील मद्य व्यावसायिकांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.आरोपी पप्पू जयस्वाल हा एमआयडीसीत रायफल बार चालवायचा. मंजूर नकाशापेक्षा जास्त आणि चुकीचे बांधकाम केल्यामुळे नासुप्रने २ फेब्रुवारीला रायफल बारचे अतिक्रमण तोडले. तिकडे राजू यांनी पप्पूच्या प्रतिस्पर्धी बार मालकाला व्यवसाय वाढीसाठी मदत केल्याच्या संशयामुळे पप्पू जयस्वाल संतापला. या पार्श्वभूमीवर, आज दुपारी ३ च्या सुमारास राजू आपल्या होंडा सिटी कारने एमआयडीसीतून घराकडे जात असताना सेंट झेवियर स्कूलजवळ आरोपी पप्पू आणि त्याच्या साथीदारांनी त्यांच्या कारला एक्सयूव्हीने (एमएच ३१/ ईए ५६७) जोरदार धडक मारली. धोका लक्षात आल्यामुळे राजू यांनी कारमधून बाहेर निघून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपी पप्पू, अशोक वाघमारे आणि इतरांनी पाठलाग करून राजूला पकडले आणि त्यांच्यावर रॉड तसेच बेस बॉलच्या दंड्याने (स्टीक) जोरदार हल्ला चढवला. डोक्यावर आणि पायावर फटके पडल्यामुळे राजू गंभीर जखमी झाले. वर्दळीच्या मार्गावर ही घटना घडल्यामुळे आजूबाजूच्यांनी धाव घेतली. जमावातील काहींनी आरोपींना पकडले. माहिती कळताच एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक महेश पाटील आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धावले. त्यांनी जखमी जयस्वाल यांना त्यांच्या मित्रांच्या मदतीने वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल केले. राजू यांच्या डोक्याला चार ते पाच टाके लागल्याची माहिती असून, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. आरोपीपैकी एकाच्या हातात चाकू होता. जीवाचा धोका लक्षात घेत राजू यांनी तो घट्ट पकडून ठेवला. यामुळे त्यांच्या हाताला इजा झाली. मात्र, चाकूचे वार करण्याची आरोपींना संधी मिळाली नाही. त्यामुळे राजू यांचे प्राण वाचले. आरोपींनी वाहनाच्या बाजूच्या दारावर कार धडकवल्यामुळे राजू यांच्या कारचीही मोडतोड झाली. (प्रतिनिधी)आरोपी कुख्यात गुंडआरोपी पप्पू आणि अशोक वाघमारे या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यातील अशोक हा नंदनवनमधील कुख्यात गुंड असून, हत्या आणि अन्य गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल असल्याचे एमआयडीसी पोलीस सांगतात.