शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांना नोंदणी नुतनीकरणासाठी ३० जूनपर्यंतची मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 00:17 IST

एमबीबीएस पास होऊन इन्टर्नशिप पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना परमनंट नोंदणी प्रमाणपत्रासाठी मुंबई गाठावी लागायची. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र सुरू असलेले ‘लॉकडाऊन’ लक्षात घेऊन ‘महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल’ने (एमएमसी) विहीत नमुन्यात आरोग्य विज्ञान विद्यापीठ व संबंधित कॉलेजकडून आवश्यक माहिती मागवून त्यांना नोंदणी प्रमाणपत्र देणार आहे.

ठळक मुद्देएमएमसीचा पुढाकार : एमबीबीएस विद्यार्थ्यांनाही नोंदणीसाठी मुंबईला जाण्याची गरज नाही

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : एमबीबीएस पास होऊन इन्टर्नशिप पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना परमनंट नोंदणी प्रमाणपत्रासाठी मुंबई गाठावी लागायची. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र सुरू असलेले ‘लॉकडाऊन’ लक्षात घेऊन ‘महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल’ने (एमएमसी) विहीत नमुन्यात आरोग्य विज्ञान विद्यापीठ व संबंधित कॉलेजकडून आवश्यक माहिती मागवून त्यांना नोंदणी प्रमाणपत्र देणार आहे. तर एप्रिल व मे महिन्यात संपत असलेली डॉक्टरांची पाच वर्षांची नोंदणी नुतनीकरणाची मुदत ३० जून २०२० पर्यंत वाढविण्याचा निर्णयही ‘एमएमसी’ने घेतला आहे.‘महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल’चे उपाध्यक्ष डॉ. विंकी रुघवानी यांंनी सांगितले, एमबीबीएस पास होऊन एक वर्षाची इन्टर्नशिप पूर्ण केलेल्यांना ‘एमएमसी’कडून कायम (परमनंट) नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करावे लागते. या प्रमाणपत्राचे आधारे पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेश दिला जातो. यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज सादर करावा लागतो आणि नंतर मूळ दस्तावेज घेऊन मुंबई येथील ‘एमएमसी’ कार्यालय गाठावे लागते. परंतु ‘लॉकडाऊन’मुळे विद्यार्थ्यांना मुंबई गाठणे शक्य होत नव्हते. याची दखल घेऊन ‘एमएमएसी’ ने विशेष सोय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली आहे. एक विहीत नमुना तयार केला असून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक, सर्व मेडिकल कॉलेज, मेडिकल डीम्ड विद्यापीठला पाठविण्यात येणार आहे. यात विद्यार्थ्याला एमबीबीएस पास झाल्याची व इन्टर्नशीप पूर्ण केल्याची माहिती भरून पाठवावी लागणार आहे. त्यानंतरच त्यांना परमनंट नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येईल.डॉ. रुघवानी म्हणाले, सर्व डॉक्टरांना दर पाच वर्षांनी ‘एमएमसी’कडे नोंदणी नुतनीकरण करावे लागते. ज्यांना पाच वर्षे झाले आणि एप्रिल आणि मे २०२० मध्ये मुदत संपत आहे. परंतु ‘लॉकडाऊन’मुळे नुतनीकरण करणे कठीण झाले आहे. त्यांच्यासाठी ‘एमएमसी’ने तीन महिन्याची मुदतवाढ दिली आहे. आता नोंदणी ३० जून २०२० पर्यंत सुरू राहणार असल्याचेही डॉ. रुघवानी यांनी सांगितले.

 

टॅग्स :doctorडॉक्टर