शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

दंडाधिकाऱ्याशिवायही नोंदविता येते मृत्यूपूर्व बयान

By admin | Updated: August 30, 2014 02:42 IST

प्रत्येक प्रकरणातील मृत्यूपूर्व बयान दंडाधिकाऱ्यांनीच नोंदविले पाहिजे हे आवश्यक नाही.

राकेश घानोडे नागपूर प्रत्येक प्रकरणातील मृत्यूपूर्व बयान दंडाधिकाऱ्यांनीच नोंदविले पाहिजे हे आवश्यक नाही. पोलीसही मृत्यूपूर्व बयान नोंदवून ते न्यायालयासमक्ष सादर करू शकतात, असा खुलासा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात केला आहे. काही प्रकरणांमध्ये रुग्णांचे आरोग्य गंभीर राहात असल्यामुळे दंडाधिकाऱ्यांना बोलाविण्यासाठी पुरेसा वेळ नसतो. तसेच, वेळेअभावी वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्रही मिळविता येत नाही. अशा प्रकरणांमध्ये मृत्यूपूर्व बयान नोंदविणे व ते प्रकरणाच्या समर्थनार्थ न्यायालयात सादर करण्यापासून पोलिसांना कोणीही प्रतिबंध केलेला नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे. यासोबतच न्यायालयाने दुसरी बाजूही स्पष्ट केली आहे. सामान्य प्रकरणांमध्ये पुरेसा वेळ उपलब्ध असतो तेव्हा तपासातील पारदर्शिता कायम ठेवण्यासाठी दंडाधिकाऱ्यांना बोलावणे पोलिसांचे कर्तव्य आहे. काही कारणांमुळे न्यायदंडाधिकाऱ्यांना बोलावता आले नाही तर संबंधित कारण रेकॉर्डवर आणले पाहिजे. हे कारण मृत्यूपूर्व बयान वैध ठरविण्याएवढे ढोस असणे आवश्यक आहे, असे न्यायालयाने नमूद केले आहे.अमरावती जिल्ह्यातील एका हत्याप्रकरणावर निर्णय देताना न्यायमूर्ती एम. एल. तहलियानी यांनी हा महत्त्वपूर्ण खुलासा केला. या प्रकरणात येवदा पोलिसांनी जखमीचे दोनदा मृत्यूपूर्व बयान नोंदविले होते. जखमीला उपचारानंतर सुटी देण्यात आली होती. घटनेच्या ३७ दिवसांनंतर जखमीचा मृत्यू झाला होता. न्यायदंडाधिकाऱ्यांना बोलावून बयान नोंदविण्यासाठी पोलिसांकडे पुरेसा वेळ होता. परंतु, त्यांनी स्वत:चे कर्तव्य योग्य पद्धतीने बजावले नाही. यासंदर्भात त्यांनी स्पष्टीकरणही सादर केले नाही. परिणामी उच्च न्यायालयात मृताचे बयान संशयास्पद ठरले.अन्य कोणाच्या तरी दबावाखाली पोलिसांनी स्वत: मृत्यूपूर्व बयान तयार केल्याची शक्यता नाकारता येत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. यासह विविध बाबी लक्षात घेता न्यायालयाने प्रकरणातील तिन्ही आरोपींना निर्दोष सोडण्याचे निर्देश दिलेत.