शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

मृत महिलेचे दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:09 IST

नागपूर : कोरोनामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या आणि नंतर मृत झालेल्या आईच्या कानातील दागिने चोरीला गेल्याची तक्रार आतिश निर्गुण ...

नागपूर : कोरोनामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या आणि नंतर मृत झालेल्या आईच्या कानातील दागिने चोरीला गेल्याची तक्रार आतिश निर्गुण गजभिये (वय ४०, रा. दौलामेटी) यांनी तहसील पोलिसांकडे नोंदवली.

विशेष म्हणजे, तहसील पोलिसांनी मंगळवारी दोन भामट्यांना अटक केली. ते कोरोनामुळे दगावलेल्या मृतांच्या शरिरावरचे दागिने, रोख रक्कम आणि मोबाईल लंपास करत होते. त्यांनीच ही चोरी केली असावी, असा संशय आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

----

प्रतापनगरात घरफोडी

नागपूर : प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्वावलंबी नगरात राहणाऱ्या आदिती अनिल गोडबोले यांच्या दाराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, हिरे, घड्याळ आणि महत्त्वपूर्ण कागदपत्रे असा दोन लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. गुरुवारी सकाळी ही चोरीची घटना लक्षात आल्यानंतर गोडबोले यांनी प्रतापनगर ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला असून, चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.

---

क्षुल्लक कारणावरून पत्नीवर हल्ला

नागपूर : क्षुल्लक कारणावरून पत्नीवर प्राणघातक हल्ला करून तिला जखमी करणाऱ्या नवऱ्याविरुद्ध लकडगंज पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रामचंद्र बिसन चकोले (वय ४५) असे आरोपीचे नाव असून, तो हरिहर नगर गरोबा मैदानजवळ राहतो. त्याची पत्नी मुक्ता चकोले यांनी दार व्यवस्थित लावले नसल्याच्या कारणावरून गुरुवारी सकाळी ७.३० वाजता आरोपीने वाद घातला. त्यानंतर पत्नीला मारहाण केली. नंतर तिच्या पायावर चाकूने वार करून जबर दुखापत केली. यावेळी शेजारी मदतीला धावल्यामुळे पुढील धोका टळला. मुक्ता यांनी दिलेल्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी कलम ३२६, ३२६, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

---