शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कोरड्या नहरात आढळली मृत मगर

By admin | Updated: February 2, 2017 02:13 IST

वाकी परिसरातून जाणाऱ्या पेंच प्रकल्पाच्या कोरड्या नहरात मृतावस्थेत मगर आढळून आली. त्यामुळे घटनास्थळी बघ्यांनी गर्दी केली.

वाकी येथील प्रकार : कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचा संशय खापा : वाकी परिसरातून जाणाऱ्या पेंच प्रकल्पाच्या कोरड्या नहरात मृतावस्थेत मगर आढळून आली. त्यामुळे घटनास्थळी बघ्यांनी गर्दी केली. मगरीच्या तोंडाचे लचके तोडलेल्या स्थितीत होते. त्यामुळे कुत्र्यांनी मगरीवर हल्ला चढवून मारले असावे, अशी शक्यता आहे. ही बाब वन विभागाला माहिती होताच घटनास्थळी जाऊन मगरीचा मृतदेह ताब्यात घेतला. खापा वन परिक्षेत्राच्या वाकी बिटअंतर्गत बबलू गायकवाड, रा. वाकोडी यांचे शेत आहे. या शेतालगतच पेंच प्रकल्पातून कोराडीकडे जाणारा कालवा आहे. सध्या या कालव्यातून पाणी सोडणे बंद आहे. त्यामुळे तो कालवा कोरडा आहे. अशात मंगळवारी दुपारच्या सुमारास काही शेतकऱ्यांना मृतावस्थेत मगर आढळून आली. त्यामुळे ती मगर पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली. याबाबत खापा वन विभागातील अधिकाऱ्यांना बुधवारी माहिती मिळताच त्यांनी सेमिनरी हिल येथील अधिकाऱ्यांना सूचना दिली. त्यानंतर अधिकारी घटनास्थळी पोहोचले. मृत मगरीचे वय अंदाजे तीन वर्ष असून चार फूट लांब आहे. मगरीचे तोंड फुटलेल्या स्थितीत होते. कालव्यातील पाण्याच्या प्रवाहात ती मगर आली असावी आणि प्रवाहामुळे जाळ्याला अडकल्याने तोंड फुटून त्यातच तिचा मगरीचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता आहे. दुसरीकडे कोरड्या कालव्यात असलेल्या मगरीवर कुत्र्यांनी हल्ला चढवून ठार केले असावे. त्यामुळेच मगरीचे तोंड लचके तोडलेल्या स्थितीत आढळले, अशीही शक्यता आहे. याबाबत सहायक वनसंरक्षक राजन मेश्राम यांनी सांगितले की, नागपूर वन विभागाने मगरीचा मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील कारवाई त्यांच्याकडूनच पूर्ण केली जाईल. दरम्यान, या भागात मृत मगर आढळल्याने आणखी काही मगरी असाव्यात अशीही शक्यता असून नागरिकांमध्ये कमालीचे भीतीयुक्त वातावरण आहे. (प्रतिनिधी) पहिलीच घटना कालव्यात मगर आढळल्याची ही पहिलीच घटना आहे. मात्र पेंच प्रकल्पात, नदीत मगरी आढळल्याची अनेक उदाहरणे आहेत. तेथूनच ही मगर कालव्याद्वारे वाकीपर्यंत आली असावी, अशी शक्यता आहे. काही वर्षांपूर्वी कोलीतमारा परिसरात कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेवर मगरीने हल्ला चढविला होता. त्यानंतरही एका मुलीवर हल्ला चढविल्याची घटना घडली होती. त्यामुळे पेंचमध्ये मगरी असण्यावर शिक्कामोर्तब झाले होते.