शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

डीसीपी पाटील यांनी एसीबीची सूत्रे स्वीकारली

By admin | Updated: June 14, 2017 01:27 IST

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) नागपूर परिक्षेत्राचे उपायुक्त म्हणून पी. आर. पाटील यांनी पदाची सूत्रे स्वीकारली.

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) नागपूर परिक्षेत्राचे उपायुक्त म्हणून पी. आर. पाटील यांनी पदाची सूत्रे स्वीकारली. आतापर्यंत या पदावर असलेले संजय दराडे यांची येथून बदली झाली आहे. त्यांच्याकडून सोमवारी पाटील यांनी सूत्रे घेतली. त्यानंतर विभागातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसोबत पाटील यांनी मंगळवारी चर्चा केली. मूळचे कोल्हापूरचे रहिवासी असलेले पाटील यांनी विज्ञान शाखेत स्नातक पदवी घेतली. एमबीए केल्यानंतर ते तहसीलदार म्हणून रुजू झाले. १९९९-२००० मध्ये त्यांची स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून थेट उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) म्हणून बदली झाली. प्रशिक्षणानंतर ते डीवायएसपी अचलपूर (जि. अमरावती) म्हणून रुजू झाले. त्यानंतर त्यांनी याच पदावर जळगाव, खेड (पुणे), पंढरपूर (सोलापूर), निफाड (नाशिक) येथे जबाबदारी सांभाळली. २०११ ला पदोन्नतीवर ते डीसीपी सोलापूर (क्राईम) म्हणून रुजू झाले. तेथील कार्यकाळ आटोपल्यानंतर त्यांची बदली पुण्याला सीआयडीचे अधीक्षक म्हणून झाली. तेथून पुण्यातच डीसीपी क्राईम म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. महिनाभरापूर्वी त्यांची नागपूर येथे एसीबीचे अधीक्षक म्हणून बदली झाली. भ्रष्टाचाराची उधळी संपवण्याचे प्रयत्न करू भ्रष्टाचार ही समाजाला लागलेली उधळी आहे. ही उधळी नष्ट करण्याचे प्रामाणिक प्रयत्न करू, अशी बोलकी प्रतिक्रिया त्यांनी लोकमतशी बोलताना नोंदवली.